मुंबई:  मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनलाही त्याच्या तालावर नाचवलं.


'स्टार प्लस'च्या नच बलिये या रिअलिटी शोमध्ये सिद्धार्थ जाधव आणि त्याची बायको तृप्ती यांनी सहभाग घेतला आहे. या जोडीने पिंगा या गाण्यावर डान्स केला. महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्धनेही या गाण्यासाठी नऊवारी साडी नेसली होती.

सिद्धार्थ आणि तृप्तीच्या डान्सने उपस्थितांनाही अक्षरश: थिरकायला लावलं.

यावेळी हृतिक रोशन प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. सिद्धार्थ आणि तृप्तीने हृतिकला पिंगा गाण्याच्या स्टेप्स शिकवल्या.

पण सिद्धार्थ आणि तृप्तीचा डान्स पाहून हृतिक चांगलाच भारावून गेला. आज रात्री हा शो स्टार प्लसवर पाहता येणार आहे.

'नच बलिये'च्या मंचावर सिद्धार्थ जाधवचा बायकोसोबत जलवा!


VIDEO: