मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करता येणार नाही, तुला शोसाठी नवीन कंटेंट तयार करावा लागेल, असं श्यामला सांगण्यात आलं. कंटेंट तयार करण्यासाठी त्याला फारसा वेळही देण्यात आला नाही. पर्यायाने त्याचं एलिमिनेशन करण्यात आलं.
अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका
या प्रकारामुळे 22 वर्षांचा श्याम प्रचंड चिडला असून त्याने कार्यक्रमाच्या टीमवर नाराजी व्यक्त केली आहे. 'मी मोदींची नक्कल करण्यात पटाईत असल्याचं त्यांना माहित होतं. मग शोमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणच का दिलं.' असं श्याम रंगीला म्हणतो.
'मोदींची नक्कल करता येणार नाही, हे त्यांनी आधी सांगितलं होतं. सुरुवातीला राहुल गांधींची फिरकी घेतल्यास चॅनेलची हरकत नव्हती. मात्र अचानक त्यांनी राहुल किंवा मोदी, या कोणाचीही मिमिक्री करता येणार नाही, असं सांगितलं. मी पंतप्रधानांना शिव्या तर घातल्या नव्हत्या. मी फक्त मिमिक्री केली. त्यात काय वावगं?' असा सवाल श्यामने केला आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन आणि 'द ग्रेट इंडियन..'च्या पहिल्या पर्वाचा विजेता सुनील पाल यांनी श्याम रंगीलाची बाजू उचलून धरली आहे. 'नेत्यांची मिमिक्री करण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो निखळ विनोद असायला हवा.' असं पाल म्हणाले.
'मी नाना पाटेकर, इरफान खान यासारख्या अनेक अभिनेत्यांची मिमिक्री केली आहे, पण कोणी कधीच आक्षेप घेतला नाही.' असं सुनील पाल यांनी सांगितलं. 'चॅनेलने हा एपिसोड दाखवायला हवा होता. मला खात्री आहे मोदींनाही कुठला आक्षेप नसता. मोदींविषयी त्याने कोणताही अपशब्द काढला नाही, की त्यांना काही वाईट-साईट बोलला नाही' असं पाल म्हणाले.
श्याम रंगीला कोण आहे?
राजस्थानचा रहिवासी असलेला श्याम रंगीला हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातल्या रायसिंहनगरमधील मोहकमवाला गावात लहानाचा मोठा झाला. 2004 मध्ये शाळेतूनच त्याने मिमिक्रीला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्याला कॉमेडियन होण्याची इच्छा होती. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने मिमिक्री करणं सुरु केलं.
यूट्यूबवर 30 हजार फॉलोवर्स
श्याम रंगीलाचं स्वतःचं यूट्यूब चॅनल असून त्याचे जवळपास 30 हजार फॉलोवर्स आहेत. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मधून एलिमिनेट झाल्यानंतरही त्याच्या प्रसिद्धीत तसूभरही फरक पडलेला नाही. त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.