मुंबई : अभिनेत्री शिवानी सुर्वेची बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री होणार आहे. बिग बॉसशी वाद घातल्यानंतर शिवानीला घराबाहेर काढण्यात आलं होतं. मात्र उद्या शिवानी बिग बॉसच्या घरात परतणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा एपिसोड रविवारी टेलिकास्ट होणार आहे.
बिग बॉसचा दुसरा सीजन विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. बिग बॉस- 2 च्या सुरुवातीच्या टप्प्यात शिवानी सुर्वे चर्चेत राहिली. शिवानीने दुसरी स्पर्धक वीणाला मारहाण केली होती. त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव शिवानीने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची विनंती केली होती. तसेच बाहेर पडण्यासाठी बिग बॉसशी कायद्याची भाषाही केल्याने तिला घराबाहेर काढण्यात आलं होतं.
आता प्रकृतीत सुधार झाल्यानंतर शिवानीने बिग बॉसच्या घरात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवानी उद्या बिग बॉसच्या घरात परतणार आहे. मात्र याला चॅनलकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
शिवानी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून परतणार आहे की गेस्ट म्हणून हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र बिग बॉसच्या घरात परतल्यानंतर इतर स्पर्धकांची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे तीन स्पर्धक विविध कारणांमुळे घराबाहेर पडले आहेत. त्यातील पराग कान्हेरेची पुन्हा घरात एन्ट्री झाली होती, मात्र त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात तो एलिमिनेट झाला.
संबंधित बातम्या