मुंबई : अँड टीव्ही वाहिनीवर प्रेक्षकांच्या लाडक्या 'भाभीजी घरपे है' मालिकेतून शिल्पा शिंदेची गच्छंती झाली. शुभांगी अत्रेने अंगुरीभाभीचा लहेजा आणि आणि लूक चांगला कॅरी केला असला तरी शिल्पाचे चाहते तिला प्रचंड मिस करत आहेत. त्यामुळे शिल्पा शिंदेच्या चाहत्यांसाठी ती पुनरागमन करत असल्याची खुशखबर आहे.


 
शिल्पा शिंदे भाभीच्या भूमिकेतून पुनरागमन करत असल्याचं वृत्त आहे. ही भूमिका अंगुरीभाभीची नाही किंवा टीव्ही शोसाठीही नाही, तर एका वेब सीरीजसाठी आहे. 'हॅपी-फाय' या वेब शोमध्ये शिल्पा दिसणार आहे. सब टीव्ही ग्रुपच्या यूट्यूब वाहिनीवर हा शो दिसणार असल्याची माहिती आहे.

 
यशराज, टीव्हीएफसारख्या बड्या निर्मिती संस्था वेब शो तयार करत आहेत. तरुण प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता शिल्पा शिंदेच्या या शोला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

 
'भाभीजी घर पे है' मालिकेच्या निर्मात्यांनी शिल्पा शिंदेची 'सिंटा'कडे तक्रार करुन तिच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिल्पा कपिल शर्माच्या शोमध्ये दिसण्याचंही वृत्त होतं, मात्र आता चाहते तिला नव्या स्वरुपात पाहण्यास उत्सुक आहेत.