मुंबई: भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिपण्णी करणाऱ्या एआयबीच्या तन्मय भटची मुजोरी कायम आहे. तन्मय भटविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली असतानाही, त्याने माफी न मागता आपल्या व्हिडीओचं समर्थन केलं आहे. याबाबत त्याने ट्विट करुन आपली भूमिका योग्य असल्याचंच एकप्रकारे दाखवलं आहे.

 

माझ्या व्हिडीओवर सगळेजण असे काही तुटून पडले आहेत, जसं काही प्रत्येकाने आतापर्यंत सभ्य जोकचं ऐकवले आहेत, असं ट्विट तन्मयने केलं आहे.

 

तन्मय भटविरोधात सर्वपक्षीय आक्रमक

दुसरीकडे तन्मय भटच्या आक्षेपार्ह व्हिडीओविरोधात सर्वपक्षीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी मनसेने मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन करत, तन्मयवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

 

याशिवाय मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही तन्मय भटविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.



तन्मय भट्टने अकलेचे तारे तोडले

‘एआयबी रोस्ट’च्या माध्यमातून चर्चेत आलेल्या विनोदी कलाकार तन्मय भटने अकलेचे तारे तोडले आहेत. ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून तन्मयने भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिपण्णी केली.

 

विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर आहे, या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडून सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातून आक्षेपार्ह शेरेबाजी या व्हिडिओत करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिप्पणी


तन्मय भटवर कडक करावई करा, निलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्र्यांना ई- मेल