मुंबई : 'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे कदाचित तुम्हाला यापुढी टीव्हीवर दिसणार नाही. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टा शिल्पावर आजीवन बंदी घालण्याच्या तयारीत आहे.


शिल्पा शिंदेच्या मध्येच सीरियल सोडण्याच्या आणि अनप्रोफेशनल वागणुकीविरोधात निर्माता बिनफेर कोहली यांनी सिन्टामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सिन्टाने नॉन कॉर्पोरेशन सर्क्युलर काढण्याचा निर्णय घेतला. या सर्क्युलरनुसार भविष्यात शिल्पा कोणत्याही चॅनल किंवा निर्मात्यांसोबत काम करु शकणार नाही.

कपिल शर्माचा शो देखील हातातून गेला...

- सिन्टाने बंदी घालण्यापूर्वी शिल्पाच्या हातातून कपिल शर्माचा शो गेला, असं टीव्ही जगतातील जाणकारांचं मत आहे.

 

- शिल्पा शिंदे कपिल शर्माच्या नव्या शोमधील बुआ अर्थात उपासना सिंहच्या भूमिकेत दिसणार होती.

 

- टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, CINTAA ने शिल्पाविरोधात नॉन को-ऑपरेशन सर्क्युलर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

- याचाच अर्थ आता तिच्यासोबत कोणत्याही चॅनल किंवा निर्मात्याला काम करण्याची परवानगी नसेल

 

- खरंतर असोसिएशनने यापूर्वी शिल्पाला शोमध्ये परतण्यास सांगितलं होतं, परंतु शिल्पा शिंदेने ते मान्य केलं नाही.

 

 

टीव्ही जगतात परतणार नाही - शिल्पा शिंदे



- या प्रकरणात शिल्पाही झुकायला तयार नाही. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली की, मी कार्यक्रमाचे निर्माते आणि आणि CINTAA विरोधात कोर्टात जाणार आहे.

 

-त्याचसोबत मी आता कधीही टीव्ही जगतात परतणार नाही. त्यामुळे कोणीही माझ्यावर बंदी घालण्याची गरज नाही, असं शिल्पाने सांगितलं.

 

संबंधित बातम्या

‘भाभीजी घर पर हैं’ मधून भाभी घराबाहेर?


'भाभी जी घर पर हैं' च्या शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस!


शिल्पाला 'भाभी जी घर पर हैं' सोडण्यासाठी कपिलने भडकावलं?


'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचं लग्न होता होता राहिलं!