Shark tank india : रिअॅलिटी शोच्या चर्चेत आता आणखी एका रिअॅलिटी शो ची भर पडली आहे. हा रिअॅलिटी शो म्हणजेच सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होणारा 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) हा रिअॅलिटी शो. मूळचा अमेरिकन रिअॅलिटी शो वर आधारित असलेला हा कार्यक्रम भारतात 'शार्क टँक इंडिया' या नावाने ओळखला जातोय. जाणून घेऊयात या रिअॅलिटी शोविषयी सविस्तर माहिती. 


ज्या लोकांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. आणि या रिअॅलिटी शोमध्ये ते ज्या कल्पनेने आले आहेत. हे जाणून घेणारा हा शो आहे. तसेच स्पर्धकांच्या वेगवेगळ्या संकल्पना या शो मध्ये परिक्षकांना ऐकवल्या जातात. त्यानंतर परिक्षकांना एखाद्या स्पर्धकाची कल्पना आवडल्यास ते त्या स्पर्धकाला आर्थिक पाठबळही देतात. एकंदरी अशा पठडीचा हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या फारंच पसंतीय पडतोय. आतापर्यंतच्या रिअॅलिटी शो मधला हा पहिला भारतीय बिझनेस रिअॅनिटी शो आहे. जो अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला आहे. 


या कार्यक्रमात देशातील मोठे सात उद्योगपती परीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. परीक्षक म्हणून सहभागी झालेले या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या उद्योगामध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे.


जाणून घ्या या रिअॅलिटी शो चे परिक्षक कोण आहेत. 


अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover)


अश्नीर हे फिनटेक फर्म ‘भारतपे’चे सह-संस्थापक आणि एमडी आहेत.


पियुष बन्सल (Peyush Bansal)


पियुष बन्सल हे 'लेन्सकार्ट’चे सीईओ आणि संस्थापक आहेत.


नमिता थापर (Namita Thapar)


नमिता थापर या एमक्यूर फार्मास्युटिकल या जागतिक औषध कंपनीच्या सीईओ आहेत. 


विनिता सिंग (Vineeta Singh)


विनिता सिंग या SUGAR कॉस्मेटिक्सच्या सीईओ आणि सह-संस्थापक आहेत.


अनुपम मित्तल (Anupam Mittal)


अनुपम मित्तल हे 'PeopleGroup-Shaadi.com'चे संस्थापक आणि सीईओ आहेत. 


महत्वाच्या बातम्या :


Shark Tank Judges Profile : एका अनोख्या कल्पनेसाठी देतायत कोटींची मदत, कोण आहेत ‘हे’ भारतीय ‘शार्क’?  


बहुचर्चित 'Shark Tank'शोचे परिक्षक कोट्यावधींच्या कंपन्यांचे मालक; पाहा कोण आहेत?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha