Sankarshan Karhade: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. संकर्षण हा सध्या त्याच्या नियम व अटी लागू (Niyam Va Ati Lagu) या नाटकाचे प्रयोग परदेशात करत आहे. नियम व अटी लागू या नाटकाच्या अमेरिकेतील प्रयोगानंतर आलेल्या अनुभवाबद्दल संकर्षणनं एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्याच्या या स्पेशल पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
संकर्षणनं सोशल मीडियावर त्याच्या नाटकाच्या प्रयोगानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण… प्लिज वाचा, आज अमेरिकेतला डॅल्लसचा प्रयोग जोरदार झाला. प्रयोगानंतर एक काकू काठी टेकवत भेटायला आल्या… त्यांचं नाव “उत्तरा दिवेकर”.या त्याच आहेत ज्यांच्या घरी अलिबागला मी 2011 साली माझा “आम्ही सारे खवय्ये” चा पहिला भाग शूट केला होता. योगायोगाने त्या सिजनचं नाव होतं “आई मला भूक लागलीये”.. आज मला त्या म्हणाल्या “मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..” इतकं भरून आलं मला. कलाकाराला काय हवंय..? हेच .. हेच..'
पुढे संकर्षणनं पोस्टमध्ये लिहिलं, 'आज 12 वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय. ”खवय्ये” मुळे मला अनेक कुटुंब भेटली , अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक “आई” भेटल्यात ज्या जगभरांत कुठेही राहात असल्या तरी माझी वाट पाहातायेत आणि आज “नियम व अटी लागू नाटकाच्या निमित्ताने भेट झाली …. THANK YOU THANK YOU आणि हो, आजपासून आमचा सिनेमा रिलिज होतोय .. महाराष्ट्रात.. “तीन अडकून सीताराम” चित्रपटगृहात जाउन नक्की बघा'
संकर्षणच्या या पोस्टला अनेकांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं संकर्षणच्या पोस्टला कमेंट केली,"असाच हळव्या मनाचा अlणि डाऊन टू अर्थ कायम रहा" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "खुपच सुंदर क्षण शेअर केलास दादा"
संबंधित बातम्या:
Sankarshan Karhade: "आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं हवेत आहे"; संकर्षणची खास पोस्ट