Big Boss 13 : बिग बॉसच्या 13 व्या सीजनसाठी सलमानचं मानधन 400 कोटींच्या पार?
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2019 07:40 PM (IST)
एका वीकेन्डला सलमानच्या तिजोरीत तब्बल 31 कोटींची भर पडणार आहे.
मुंबई : बिग बॉसच्या आगामी सीजनसाठी सलमान खानला प्रत्येक एपिसोडला तब्बल 16 कोटी रुपये मिळणार असल्याचं बोललं जात आहे. सलमानने जेव्हा बिग बॉस होस्ट करायला सुरुवात केली तेव्हा तो प्रत्येक एपिसोडला 2.5 कोटी रुपये घेता होता. सहाव्या सीजनपर्यंत तो प्रत्येक एपिसोडसाठी 2.5 कोटी रुपये घ्यायचा. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानला बिग बॉसच्या 13 व्या सीजनच्या होस्टिंगसाठी तब्बल 403 कोटी मिळणार आहेत. बिग बॉसच्या आगामी सीजनमधील 24 एपिसोडसाठी हे मानधन देण्यात येणार आहे. त्यामुळे एका वीकेन्डला सलमानच्या तिजोरीत तब्बल 31 कोटींची भर पडणार आहे. सातव्या सीजनला त्याने ही रक्कम दुप्पट केली आणि त्याने थेट 5 कोटी रुपये घ्यायला सुरूवात केली. यानंतर आठव्या सीजनला 5.5 कोटी आणि नवव्या सीजनला तो 7-8 कोटी रुपये एका एपिसोडसाठी घेत होता. यानंतर दहाव्या सीजनला त्याला एका एपिसोडसाठी 8 कोटी मिळत होते. अकराव्या सीजनला 11 कोटी रुपये सलमानने आकारले होते. मागच्या म्हणजेच बाराव्या सीजनला 12-14 कोटी सलमानने आकारले होते. आणि तेराव्या सीजनला आता त्याला जवळपास 16 कोटी एका एपिसोडसाठी मिळणार आहेत. थोडक्यात सलमान खानसाठी प्रत्येक विकेंड 31 ते 32 कोटींची कमाई करुन देणारा असेल.