मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारे 'सैराट'चे आर्ची आणि परशा विविध कार्यक्रम, रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहेत. नुकतंच 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेर लावल्यानंतर आता रिंकू-आकाशने 'सो यू थिंक यू कॅन डान्स' या डान्स रिअॅलिटी शोमधल्या सगळ्यांनाच याड लावलं.
'अँड टीव्ही' वरील या रिअॅलिटी शोमध्ये दोघांनी अक्षरश: धम्माल केली. या एपिसोडमध्ये एका जोडी याड लागलं गं, या गाण्यावर डान्सही केला. शिवाय दोघांनी सिनेमातील काही डायलॉग्जही बोलून दाखवले. रिंकूने माधुरीसोबत ठुमके लगावले. तर पैलवान आकाशने शोचा होस्ट ऋत्विकला धोबीपछाड दिला.