कपिलही 'सैराट', 'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2016 03:19 AM (IST)
मुंबई : नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने 'कॉमेडी किंग' कपिल शर्मालाही याड लावलं आहे. नुकतचं 'सैराट'च्या संपूर्ण टीमला 'द कपिल शर्मा शो'मध्ये आमंत्रित केलं होतं. या खास भागाचं शूटिंग काल (रविवार) पार पडलं. आतापर्यंत कपिलच्या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींची हजेरी असायची. शोमध्ये हिंदी सिनेमांचं प्रमोशन व्हायचं. मात्र 'सैराट'च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या टीमने हिंदीतील सर्वात लोकप्रिय शोमध्ये आपली हजेरी लावली आहे.