'शेमारु बॉलिगोली' या अकाऊंटवरुन 16 ऑगस्टला 'आमची मुंबई - द मुंबई अँथम' नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. सचिन पिळगावकरांनी हे गाणं गायलं असून त्यात ते नृत्य करताना दिसत आहेत. सचिन पिळगावकर यांनी या व्हिडीओमध्ये काम केल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर कोणी थेट्र ट्रोल केलं.
'आमची मुंबई' अल्बममधील हे गाणं मोहम्मद अकील अन्सारी यांनी लिहिलं असून व्हिडीओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविड यांनी केलं आहे. 'मुंबई शहरात अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हीचं वैशिष्ट्यं या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे' असं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं होतं.
काही वर्षांपूर्वी एका कॉश्चुम डिझायनर मित्राला मदत करण्याच्या उद्देशाने हे गाणं माझ्यावर शूट केलं गेलं. सेटवर गेल्यावर काही क्षणातच मला होत असेलली गडबड लक्षात आली. स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे दुसऱ्यांच्या कामात दखल घेतली नाही, तर स्वत: निर्माता असल्यामुळे आयत्या वेळी सेट सोडून गेल्यास होणाऱ्या नुकसानाबद्दलही माहिती होती, म्हणून तेही केलं नाही, असं सचिन पिळगावकरांनी फेसबुक पोस्टवर लिहिलं.
फेसबुक यूझरने अपलोड केलेला सचिन पिळगावकर यांचा व्हिडिओ