मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या नागराज मंजुळेच्या 'सैराट'ने बॉक्स ऑफिसच नाही तर फेसबुक, व्हॉट्सअपवर धुमाकूळ घातला आहे. आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्याबाबत जाणून घेण्यात चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या लाडक्या आर्ची-परशाचं ऑफिशियल फेसबुक पेज सुरु करण्यात आलं आहे.




सैराट हिट झाल्यानंतर रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, नागराज मंजुळे यांच्या नावाची बनावट फेसबुक अकाऊंट सुरु झाली होती. त्यावरुन अनेक फोटो, स्टेटस पोस्ट करण्यात येत होते. परंतु त्या अकाऊंट्सवरुन चुकीच्या बातम्या, अफवा पसरवल्या जात होत्या. इतकंच नाही तर काही ही अतिउत्साही चाहत्यांनी रिंकू आणि आकाशचं खरं अकाऊंट ब्लॉक केलं.

 

त्यामुळे आता रिंकू आणि आकाशचं नवं आणि ऑफिशियल फेसबुक पेज सुरु करण्यात आलं आहे. नागराज मंजुळेच्या फेसबुक पेजवरुन रिंकू, आकाश आणि नागराजच्या फेसबुक पेजची लिंक शेअर करण्यात आली आहेत.

फेसबुक पेज

आर्ची -  https://www.facebook.com/Rinkurajguruu/

परशा - https://www.facebook.com/akash.thosar.16

नागराज मंजुळे- https://www.facebook.com/Nagrajpopatraomanjule/

फेसबुक पेजची लिंक