Rhea Chakraborty: व्हीजे म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बराच काळ मनोरंजनक्षेत्रापासून दूर होती. रिया लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. रिया एमटीव्ही शो 'रोडीज'  (Roadies Season 19) च्या 19 व्या सीझनमध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे.


रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'रोडीज 19' चा  प्रोमो शेअर केला आहे. 'रोडीज कर्म या कांड' च्या प्रोमोमध्ये रिया ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, “तुम्हाला काय वाटलं होतं की, मी परत येणार नाही, मला भीती वाटेल… घाबरण्याची वेळ दुसऱ्याची आहे. ऑडिशनला भेटू." या कार्यक्रमात प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यासोबत रिया 'गँग लीडर'च्या भूमिकेत दिसणार आहे.


पाहा प्रोमो:






रिया चक्रवर्तीने  एका मुलाखतीत रोडीज या कार्यक्रमाबद्दल सांगितलं.  ती म्हणाली, “मी 'रोडीज – कर्म या कांड' या कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे. सोनू सूद आणि गँग लिडर्ससोबत काम करून या रोमांचक प्रवासात मी माझी निर्भय बाजू दाखवीन. मला आशा आहे की या कार्यक्रमामुळे मला चाहत्यांचा पाठिंबा आणि प्रेम मिळेल. यावेळी सोनू सूदही शोमध्ये दिसणार आहे.'


रिया चक्रवर्तीचे चित्रपट


रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013मध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  रियानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं ‘सोनाली केबल’, ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘बँक चोर’, ‘चेहरे’ आणि ‘जलेबी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2020मध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रियावर काही आरोप करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी रियाला ट्रोल केले होते. रिया ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या रोडीज या आगामी कार्यक्रमाची आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


PHOTO : नववधू प्रिया मी बावरते… रिया चक्रवर्तीचा ब्रायडल अवतार पाहिलात का?