Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माऊली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. 


'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माऊलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माऊली आणि त्यांची भावंड यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले. 


'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेत  माऊली आणि त्यांची भावंडं यांच्याबरोबर संत सेना महाराज यांची भेट झाली. आत्तापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली असून मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. 






'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे 500 भाग पूर्ण होत आहेत. माऊलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माऊलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माऊली आणि त्यांची भावंडं कसे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे. 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे 500 भाग पूर्ण झाले असून येत्या रविवारी 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ही मालिका गेले अनेक महिने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करते आहे. माऊलींचे चमत्कार, त्यांनी केलेलं गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळाली. मालिकेत दाखवली गेलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेने स्थान निर्माण केलं आहे. 


'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत नंदेश उमप संत सेना महाराजांच्या भूमिकेत


संत सेना महाराज यांची भूमिका नंदेश उमप साकारत आहे. नंदेश उमप हे संगीत क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या वेशाची/पेहरावाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत सेना महाराज आणि संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडं यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे असेल. 


संबंधित बातम्या


Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे 200 भाग पूर्ण; प्रेक्षक भक्तिरसात तल्लीन