Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan Family Story : यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) नव्या सीझनची जोमदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्याच 16 स्पर्धकांनी एकमेकांशी ओळख वाढवण्यासाठी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणवर (Suraj Chavan) सगळ्यांची नजर खिळली आहे. बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी घरातील लोकांसोबत बोलताना सूरजने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.
आपल्या रील्सने लोकांना हसवणाऱ्या सूरज चव्हाणने नशिबाने आपल्यसोबत कसा गुलिगत धोका दिला, हे घरातील इतर सदस्यांसोबत बोलताना सांगितले. पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण आणि घरातील काही सदस्य गप्पा मारत होते. त्यावेळी सूरजने आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले.
सूरजने केलं मोकळ मन...
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसोबत सूरजने सांगितले की, बालपणापासून हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढले. लहान असताना वडिलांचे कॅन्सरने निधन झाले. वडिलांच्या निधनाने आईला प्रचंड धक्का बसला. वडिलांच्या आजारापणामुळे सतत असलेली चिंता आणि त्यांच्या निधनानंतर आईला खूपच धक्का बसला. त्यानंतर एके दिवशी आईला रक्ताची उलटी झाली. माझी आई आणि आजी या दोघींचे एकाच दिवशी निधन झाले असल्याचे सूरजने सांगितले.
बहिणींनी केला सांभाळ...
सूरजने पुढे सांगितले की, आई-बाबा, आजी-आजोबा कोणीच हयातीत नाही. फक्त एक आत्या आणि पाच बहिणी आहेत. त्यांनी मला सांभाळलं असल्याचे सूरजने सांगितले. माझी अनेकांनी फसवणूक केली आहे, त्यामुळे बहिणी मला सुधारण्याचा सल्ला देतात असेही त्याने सांगितले. . टिकटॉक होतं तेव्हा मला उद्घाटनाला एका दिवसाला 80 हजार मिळायचे. आता 30 ते 50 हजार रुपये मिळतात" असेही त्याने सांगितले. माझ्यासोबत असणाऱ्यांनी माझी फसवणूक केली असल्याचे सूरजने सांगितले.
आम्ही शून्य असताना सूरज स्टार होता, 'डीपी'ने केलं कौतुक....
'बिग बॉस मराठी'च्या घरात धनंजय पोवार उर्फ 'डीपी' हा रील स्टारही आहे. धनंजयने सूरज चव्हाणचे कौतुक केले. धनंजयने सांगितले की, "आमच्या आधीपासून सूरज काम करतो. आम्ही त्याचे व्हिडिओ पाहायचो. आमचे शून्य फॉलोवर्स असताना त्याचे दोन-तीन लाख फॉलोवर्स होते. पण, त्याला ते कंटिन्यू करता आले नाही. समाज आपल्याबरोबर कसा वागतोय, हे त्याला कळत नाही. त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी त्याला सपोर्ट केला नाही. त्याचा गैरफायदा घेतला. तो खूप फेमस झाला होता. त्याच्या नावाचे शर्ट निघाले होते, असेही धनंजयने सांगितले.