Shailesh Lodha : छोट्या पडद्यावरी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील दिशा वकानी, नेहा मेहता, गुरुचरण सिंह या  कलाकारांनी काही दिवसांपूर्वी मालिकेचा निरोप घेतला. आता अशी चर्चा सुरू आहे की, शैलेश लोढा (Shailesh Lodha) हे देखील या मालिकेचा लवकरच निरोप घेणार आहेत. मालिकेमध्ये शैलेश तारक मेहता ही भूमिका साकारत होते.  

Continues below advertisement


रिपोर्टनुसार, गेल्या एक महिन्यापासून शैलेश हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे शूटिंग करत नाहीयेत. या मालिकेच्या सेटवर पुन्हा यायचा शैलेश यांचा प्लॅन नाहीये. या मालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमुळे शैलेश नाराज आहेत. त्यांच्या मते त्यांच्या डेट्सचा वापर शोमध्ये निट केला जात नाहीये. या मालिकेमुळे शैलेश यांना इतर कामे करायला वेळ मिळत नाही. त्यांनी या मालिकेमुळे बऱ्याच ऑफर्स नाकारल्या. सध्या मालिकेचे निर्माते हे शैलेश यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शैलेश हे मालिकेचा निरोप घेणार की नाही? हे लवकरच प्रेक्षकांना समजेल. 


शैलेश लोढा यांच्या तारक मेहता का उल्टा चाष्मा या मालिकेतील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांच्या आणि जेठालालच्या मैत्रीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तारक मेहता हे मालिकेमध्ये जेठालालचे फायर ब्रिगेड असतात. जेठालालला कोणतीही समस्या जाणवली की ती सांगायला तो तार मेहता यांच्याकडे जात असतो, असं मालिकेमध्ये दाखवलं आहे. 


28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेमधील कलाकारांचे जून फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  शैलेश यांच्यासोबतच जेठालाल आणि पोपटलाल यांचे जूने फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


हेही वाचा :