Jau Bai Gavat : काही दिवसांपूर्वी झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat) हा कथाबाह्य कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रविवार 11 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची विजेती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी देखील पसंती दर्शवली. आज या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची धूम पाहायला मिळणार आहे. हा महाअंतिम सोहळा पाच स्पर्धकांमध्ये रंगणार आहे. 






अस्सल मराठी मतीतला आणि गावाशी जोडलेली घट्ट नाळ असं या कार्यक्रमाचं स्वरुप होतं. त्यामुळे या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना देण्यात आलेले टास्क प्रेक्षकांना आवडले. या कार्यक्रमात पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. यामध्ये रशमा फारुकी, रसिका ढोबळे, संस्कृती साळुंके, स्नेहा भोसले आणि श्रेजा म्हात्रे यांचा समावेश आहे. जवळपास 3 महिने या कार्यक्रमाची धूम प्रेक्षकांनी अनुभवली. 






पाहायला मिळणार स्पर्धकांचा प्रवास


या महाअंतिम सोहळ्यामध्ये या पाचही स्पर्धकांचा या कार्यक्रमातील प्रवास पाहायला मिळणार आहे. तसेच हे स्पर्धक दमदार परफॉर्मन्स देखील सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला खास पाहुणे म्हणून आदेश बांदेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर हजेरी लावणार आहे. 






हार्दीक जोशीने केलं सूत्रसंचालन


अभिनेता हार्दीक जोशी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका नव्या भूमिकेत झळकला. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी हार्दीकने सांभाळली आहे. तसेच आज संध्याकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Marathi Actor : निर्मितीमधील पदार्पणानंतर 'ही' अभिनेत्री ठेवणार ओटीटीवर पाऊल, झळकरणार 'या' हिंदी वेब सिरिजमध्ये