Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan ) करतो. बिग बॉसचा सध्या 15 वा सिझन सुरू आहे. या सिझनमध्ये काही स्पर्धकांनी भाग घेतला आहे. बिग बॉसच्या मागील सिझनमुळे म्हणजेच बिग बॉस-14 मुळे अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) विशेष लोकप्रियता मिळाली होती. बिग बॉस-15  (Bigg Boss 15)  मध्ये देखील राखीने एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसच्या घरातील राखीचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राखीसोबत राखीचा नवरा रितेश देखील बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतो. 


बिग बॉस 15 च्या नव्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राखीचा नवरा रितेश हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतो आणि राखी त्याचे स्वागत करते सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट केल्या आहेत. काहींचे असे मत आहे की हे  सर्व फेक आहे, तो राखीचा खरा नवरा नाहिये. तर एका नेटकऱ्याने अशी कमेंट केली की, 'जो पर्यंत मी एपिसोड बघत नाही तो पर्यंत मी विश्वास ठेवणार नाही.'  






राखीचे संपत्ती
न्यू क्रेबने दिलेल्या माहितीनुसार, राखी सावंतकडे 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राखीकडे मुंबईत दोन प्लॅट आणि एक बंगला आहे. ज्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. राखीकडे 21.6 लाख रुपयांची एक फोर्ड एंडीवर कार आहे. राखीची सर्वाधिक कमाई स्टेज परफॉर्मेंसमधून होते. याव्यतिरिक्त ती भोजपुरी चित्रपटांमध्ये आयटम नंबरही करते.  


Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'


Shah Rukh Khan and Gauri: पॅरिस सांगितलं, पण पोहोचले दार्जिलिंगला; शाहरुख खान-गौरीच्या लव्हस्टोरीचा न ऐकलेला किस्सा