Shah Rukh Khan and Gauri: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri) ही चर्चेत असणारी जोडी आहे.  25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरूख आणि गौरीचे लग्न झाले.  शाहरूख आणि गौरीची लव्ह स्टोरी देखील हटके आहे. शाहरूख खानच्या जीवनावर आधारित असलेल्या 'किंग ऑफ बॉलीवुड: शाहरुख खान अॅंड द सेडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा'  या पुस्तकात  शाहरूख आणि गौरीच्या लव्ह स्टोरीचा उल्लेख केला आहे.  एका अवॉर्ड शोमध्ये शाहरूखने त्यांच्या हनिमूनचा एक भन्नाट किस्सा सांगितला होता. 

Continues below advertisement

एका अवॉर्ड शोमध्ये शाहरूखने सांगितले होते, 'मी गौरीला सांगितले होतो की, आपण हनिमूनसाठी पॅरिसला जाऊ पण माझ्याकडे विमानाच्या तिकीटासाठी पैसे नव्हते. मी त्यावेळी गरीब होतो.  मी राजू बन गया जेंटलमॅन या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्या चित्रपटाचे चित्रीकरण दार्जिलिंगमध्ये सुरू होते. त्यामुळे मी गैरीला पॅरिसला जाऊ सांगितलं होत परंतू तिला मी दार्जिलिंगला घेऊन गेलो. ' शहारूख आणि गौरीची ओळख दिल्लीमधील एका पार्टीमध्ये झाली. दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या घरी ही पार्टी होती. त्यानंतर गौरी आणि शाहरूखच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

Atrangi Re Trailer: 'अतरंगी रे' चा ट्रेलर शेअर करताना अक्षयकडून झाली 'ही' चूक; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Continues below advertisement

 शाहरूखच्या कभी खुशी कभी गम,  दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.  कुछ कुछ होता है,  ओम शांती ओम, माय नेम इज खान आणि दिलवाले या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता लवकरच शाहरूखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटात शाहरूखसोबत  सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार देखील दिसणार आहेत. 

Samantha React On Priyanka Chopra : प्रियांकाने निक जोनसची उडवली खिल्ली; समंथाच्या रिअ‍ॅक्शनने वेधलं लक्ष

Shah Rukh Khan: बॉलिवूडच्या किंग खान आहे एवढ्या संपत्तीचा मालक; किती घेतो मानधन?