मुंबई: बिग बॉसच्या घरात मी काहीही चुकीचं केलेलं नाही. माझं कुटुंब, मित्र परिवार किंवा कोणालाही वाईट वाटेल, ते दुखावतील असं काही केलं नाही. रेशम टिपणीस आयुष्यभरासाठी माझ्या घरातील सदस्य असेल, असं अभिनेता राजेश शृंगारपुरेने सांगितलं.


‘मराठी बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या राजेश शृंगारपुरेने एबीपी माझाशी खास गप्पा मारल्या.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी बायकोला मिठी मारली. तिलाही आनंद झाला, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं.

मी जे वागलो ते खरं होतं. रेशमसोबतचे माझं नातं आयुष्यभरासाठी असेल. एक मैत्रिण म्हणून ती कायमची माझ्या घरची सदस्य असेल. बिग बॉस मराठीमध्ये एक जिवाभावाची मैत्रिण मला भेटली, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं.

पहिली प्रतिक्रिया?

बिग बॉसच्या घरात होतो तेव्हाही बरं वाटतं होतं, आता बाहेर आलोय, इथेही बरं वाटतंय. गेम संपला, आता खऱ्या जगाशी संबंध आहे, असं राजेश म्हणाला.

रेशमला वावगं वाटलं नाही, तर काय चूक?

रेशमला काही वावगं वाटलं नाही, घरच्यांना वाईट वाटलं नाही, तर मी कशी काय चूक केली? असा सवाल राजेशने उपस्थित केला.

 बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते  

एक व्यक्ती आवडते तर ती मनापासून आवडते की वरवर आवडते. काही व्यक्ती अशा असतात, ज्या आयुष्यभरासाठी आपल्याशा वाटतात. रेशमने स्वत:साठी काहीच केलं नाही, तिने  जे काही केलंय ते दुसऱ्यांसाठीच, त्यामुळे मी तिच्यासोबत होतो आणि राहीन, असं राजेश म्हणाला.

महेश मांजरेकरांनी झापलं

महेश मांजरेकरांनी झापलं त्यावेळी मनात काय विचार आले, याबाबत विचारलं असता, राजेश म्हणाला, “महेश सरांनी प्रतिक्रिया सांगितल्या. मात्र बाहेर काय चाललंय हे आम्हाला कळत नव्हतं. व्हल्गरपणाची भावना महेश सरांचं वैयक्तिक मत असेल असं वाटलं. सोशल मीडियातील प्रतिक्रियाबद्दल काही म्हणायचं नाही. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी चूकतोय हे अंतर्मनाला वाटलं नव्हतं”.



सगळीकडे कॅमेरे

बिग बॉसच्या घरात सगळीकडे कॅमेरे होते, खाज अली तरी बाथरुममध्ये जावं लागत होतं. त्यामुळे काही गैर करण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्य मनातही तसं काही नव्हतं, असं राजेशने नमूद केलं.

टास्क पूर्ण केला

रेशमसोबतच्या मैत्रीमुळे खेळावरचं लक्ष्य विचलित झालं असा आरोप होतो. मात्र आमचा फोकस हलला नाही, आम्ही टास्कमध्ये नीट खेळलो आणि जिंकलो, असं त्याने सांगितलं.

म्हणून आस्ताद त्या ग्रुपमध्ये

गट पाडणं आमच्या हाती नव्हतं, आस्तादने ग्रुप बदलला नाही. तो बिग बॉसचा निर्णय होता. आस्ताद नसता तर मी त्या ग्रुपमध्ये गेलो असतो, असं राजेशने स्पष्ट केलं.

वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली तर

वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली तर परत मी बिग बॉसमध्ये जाईन. पण त्यावेळी नव्या स्ट्रॅटेजीने, तयारी करुन जाईन, असं राजेश म्हणाला.

VIDEO:



संबंधित बातम्या 

राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर  

बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद  

मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव.... 

रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार  

बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते  

बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती