मुंबई: मराठी बिग बॉसच्या घरातून अभिनेता राजेश शृंगारपुरे बाहेर पडला आहे. ‘विकेंडचा डाव’ या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’ महेश मांजरेकर यांनी याबाबतची घोषणा केली.


रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यातील जवळीकीमुळे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. या दोघांना बिग बॉस आणि वाईल्ड कार्ड एण्ट्री घेतलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकरने चांगलंच झापलं होतं.

सगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे राजेश शृंगारपुरेला आता बीग बॉसच्या घरातून डच्चू मिळाला आहे.



कालच्या भागात निवडूंग आणि गुलाब देण्याचा टास्क होता. एका स्पर्धकाने कोणत्याही एका आवडत्या स्पर्धकाला गुलाब आणि नावडत्याला निवडूंग द्यायचं होतं. त्यामुळे कालच्या भागातही मोठी रंगत आली.

बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते  

अनिल थत्ते बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर, राजेश शृंगारपुरे सध्या बिग बॉसमधील सर्वात चर्चेतील चेहरा होता. कारण रेशम टिपणीस सोबतचे त्याचे काही प्रसंग चर्चेत आहेत. असे सारे असताना, राजेशच बिग बॉसमधून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या काल सकाळपासूनच येत होत्या. त्यामुळे बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये काहीशी संभ्रमाची अन् उत्सुकतेची भावना होती. त्यामुळे कालच्या भागाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

राजेश शृंगारपुरेमुळे बिग बॉसमधील टास्कनाच वेगळी रंगत येत नाही, तर बिग बॉसच्या घरातील एकंदरीतच वातावरण काहीसं वेगळं राहतं. त्यात रेशम टिपणीस आणि त्याच्यातील केमेस्ट्रीमुळे तर राजेश फोकसमध्ये होता.

‘आपला मराठी बिग बॉस’ सध्या मराठी टीव्ही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनलं आहे. रोज अगदी न चुकता बिग बॉसचे भाग पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, बिग बॉसचा भाग संपल्यानंतरही प्रवासात म्हणा किंवा आणखी कुठेही, या कार्यक्रमातील घडामोडींवर अत्यंत गांभिर्याने चर्चा करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही.

संबंधित बातम्या 

‘बिग बॉस’मधून राजेश शृंगारपुरे बाहेर पडणार?  

 बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद  

मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव.... 

रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार  

बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते  

बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती