मुंबई : मराठी बिग बॉस कार्यक्रमातून अभिनेता राजेश शृंगारपुरेला बाहेरचा रस्ता धरावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या भागातच राजेशला बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे.


अनिल थत्ते बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर, राजेश शृंगारपुरे सध्या बिग बॉसमधील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. कारण रेशम टिपणीस सोबतचे त्याचे काही प्रसंग चर्चेत आहेत. असे सारे असताना, राजेशच बिग बॉसमधून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये काहीशी संभ्रमाची अन् उत्सुकतेची भावना आहे. त्यामुळे आजच्या भागाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजेश शृंगारपुरेमुळे बिग बॉसमधील टास्कनाच वेगळी रंगत येत नाही, तर बिग बॉसच्या घरातील एकंदरीतच वातावरण काहीसं वेगळं राहतं. त्यात रेशम टिपणीस आणि त्याच्यातील केमेस्ट्रीमुळे तर राजेश फोकसमध्ये आहे. त्यामुळे राजेश जाणार की राहणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘आपला मराठी बिग बॉस’ सध्या मराठी टीव्ही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनलं आहे. रोज अगदी न चुकता बिग बॉसचे भाग पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, बिग बॉसचा भाग संपल्यानंतरही प्रवासात म्हणा किंवा आणखी कुठे, या कार्यक्रमातील घडामोडींवर अत्यंत गांभिर्याने चर्चा करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही.