मुंबई : मराठी बिग बॉसमध्ये रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरेच्या रोमान्सची जोरदार चर्चा आहे. आता बिग बॉसच्या घरात अभिनेत्री हर्षदा खानविलकरच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.


'पुढचं पाऊल' या मालिकेत आक्कासाहेब बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हर्षदा खानविलकरची बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री झाली. पहिल्यात एपिसोडमध्ये रोखठोक मतांनी, प्रश्न आणि उत्तरांनी तिने सगळ्यांची मनं जिंकली.

रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार

रेशम, राजेशसह सगळ्यांना झापलं!
मराठी टीव्ही आणि सिनेसृष्टीत हर्षदा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. घरात प्रवेश केल्यानंतर बिग बॉसने दिलेल्या पहिल्याच 'बिंब प्रतिबिंब' टास्कमध्ये तिने राजेशची खरडपट्टी काढलीच, पण रेशमलाही चांगलंच झापलं. शिवाय इतर स्पर्धकांनाही खडे बोल सुनावले.

स्पर्धकांच्या घरामधील वागणुकीमुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांची इमेज कशी झाली आहे, हे सगळ्यांना सांगण्याची जबाबदारी हर्षदावर सोपवण्यात आली होती.

बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते

म्हणून हर्षदा बिग बॉसमध्ये!
दरम्यान बिग बॉसला अपेक्षित टीआरपी मिळत नव्हता. त्यामुळे हर्षदाला घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. आक्कासाहेब ही व्यक्तिरेखा साकारताना पुढचं पाऊलचा टीआरपी चांगला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात असलेली हर्षदाच्या इमेज पाहता तिला बिग बॉसच्या घरात आणल्याचं म्हटलं जात आहे.

इन्स्टाग्रामवरही एन्ट्री
बिग बॉसच्या घरात येण्याआधी सकाळीच हर्षदाने एन्स्टाग्रामवर एन्ट्री केली होती. इन्स्टाग्रामवर येताच तिच्या फॉलोअर्संनी हजारोंचा टप्पा गाठला. आता बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे चॅनलची स्ट्रॅटेजी कामी आल्याचं दिसत आहे.

मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव....