Charu Asopa- Rajeev Sen Separation : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारु असोपा (Charu Asopa) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, दोघांनी आता विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून ते कायदेशीर मार्गानं वेगळे होणार आहेत.
सोशल मीडियावरुन हटवले फोटो
चारू आणि राजीव यांच्यात सर्व काही सुरळीत करण्याचा त्याच्या कुटुंबानं प्रयत्न केला होते. पण राजीव आणि चारू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून आता चारुनं राजीवसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन हटवले आहेत. चारुनं नुकताच यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करुन नाव न घेता राजीववर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता लवकरच हे दोघे वेगळे होणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे.
चारू आणि राजीव यांनी 9 जून 2019 रोजी रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर 16 जून रोजी त्यांचा गोवा येथे विविह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चारूने एका मुलीला जन्म दिला होता. झियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. दोघेही दररोज बाळासोबतचे फोटो शेअर करत असतात.
चारुनं केलं मालिकांमध्ये काम
चारु ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बालवीर, येह रिश्ता क्या केहलाता है, लव्ह बाय चान्स, लाडो-2 या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर Impatient Vivek या चित्रपटामधून तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 24 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- Biopics On Cricketers : एम. एस धोनी ते चकदा एक्सप्रेस; क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणारे चित्रपट
- Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवचा घटस्फोट? पत्नीनं हटवलं सोशल मीडियावरुन 'जाधव' आडनाव, चर्चांना उधाण