Rajeev Sen, Charu Asopa : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) प्रमाणेच तिचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) सध्या चर्चेचा भाग बनला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते कायदेशीररित्या वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. पण, आता असे दिसतेय की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. तसेच, दोघांमधील वाद देखील मिटले आहेत. चारू आणि राजीव यांनी पॅचअप केले आहे. नुकतेच चारूने इन्स्टाग्रामवर तिचे नावही बदलले आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर, राजीवने चारूसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राजीवने चारूसोबतचा एक क्यूट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना राजीवने गुलाबाची इमोजी पोस्ट केली आहे. राजीव आणि चारूचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघांनी एकमेकांची चूक माफ करावी आणि या नात्याला पुन्हा संधी द्यावी, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. अखेर त्यांचा हा फोटो पाहून चाहते देखील खुश झाले आहेत.
चारूने बदलले नाव
दुसरीकडे चारू असोपाने देखील इन्स्टाग्रामवर तिचे आडनाव बदलले आहे. तिने आपले नाव बदलून चारू असोपा सेन असे केले आहे. तेव्हापासून तिचे आणि राजीवचे पॅचअप झाले असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. जेव्हा राजीवला त्याच्या आणि चारूच्या पॅचअपबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, 'माझ्या नवीन पोस्टमधील फोटोने सर्वकाही सांगितले आहे.' चारूने आडनाव बदलल्यानंतरच राजीवने हा फोटो शेअर केला आहे.
पाहा पोस्ट :
चारू आणि राजीव यांनी 9 जून 2019 रोजी रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर 16 जून रोजी त्यांचा गोवा येथे विविह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चारूने एका मुलीला जन्म दिला होता. झियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. दोघेही दररोज बाळासोबतचे फोटो शेअर करत असतात. चारू आणि राजीव यांनी त्यांच्या लग्नातील अडचणी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. राजीवने चारूवर पहिल्या लग्नाचे सत्य लपवल्याचा आरोप केला होता. तर, चारूने राजीवसोबतच्या नात्याला टॉक्सिक म्हटले होते.
हेही वाचा :