Yog Yogeshwar Jai Shankar : 'योगयोगेश्वर जय शंकर' (Yog Yogeshwar Jai Shankar) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेचा खास रक्षाबंधन विशेष भाग होणार आहे. तर पावनीच्या भूमिकेत सृष्टी पगारे दिसणार आहे. 


श्रावण महिन्याचे हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. याच बरोबर येते संततीरक्षणार्थ  केली जाणारी जिवतीची पूजा,या पूजेचे महत्व देखील काही  खास आहे. लवकरच कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे. 


मालिकेत गोष्टी रूपात जिवतीची पूजा दाखवली जाणार आहे. याचसाठी मालिकेत एक विशेष एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रमा बनून मराठी मनावर जिने अधिराज्य गाजवले,  सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले अशी आपल्या सगळयांची लाडकी सृष्टी पगारे मालिकेत पावनीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.  


मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग होणार खास


मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचे कुटुंब राहायला येणार असून त्यांचीच मुलगी पावनी. जिचा विश्वास आहे तिचा भाऊ परत येणार आहे असे तिला भास देखील होत आहेत. आता पावनीचे हे भास खरे आहेत का? तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का? बाळ शंकर यात तिची मदत कशी करतील? हे सगळे मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागांमध्ये बघायला मिळणार आहे.


भूमिकेविषयी सृष्टी म्हणाली,"मी या भूमिकेसाठी खूपचं उत्सुक आहे. आरुषसोबत काम करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. कामाबरोबर बरीच धम्माल मस्ती देखील सुरू असते आमची सेटवर. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि आमची मालिका नक्की बघा". 


मालिका कुठे पाहाल? कलर्स मराठीवर संध्याकाळी 7. वाजता


संबंधित बातम्या


Yog Yogeshwar Jai Shankar : 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला