Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Mukta Barve: चिंचवडमध्ये गेलं बालपण, पुण्याच्या ललित कला केंद्रामध्ये घेतलं शिक्षण; नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या मुक्ता बर्वेबद्दल जाणून घ्या...


Mukta Barve: मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मुक्ताच्या नव्या प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. जाणून घेऊयात मुक्ताच्या बालपणीबद्दल आणि तिच्या मालिका आणि चित्रपटांबद्दल...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kiran Mane: 'सिंधुताई माझी माई' मालिकेत किरण माने साकारणार 'ही' भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाले, 'त्याच्या संघर्षाचंच...'


Sindhutai Mazi Mai: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal)  यांच्या आयुष्यावर आधारित असणारी  “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai)  ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची झलक दिसत आहे. नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करुन “सिंधुताई माझी माई  या मालिकेतील त्यांच्या भूमिकेची माहिती दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sahkutumb Sahparivar : 'अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना...'; सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीच्या पोस्टनं वेधलं लक्ष


Sahkutumb Sahparivar : छोट्या पडद्यावरील सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahparivar) या मालिकेनं 1000 भागांचा टप्पा गाठला आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. नुकतीच या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


N D Mahanor Passes Away: "जैत रे जैत", 'एक होता विदूषक' या चित्रपटांमधील गाण्यांचे गीतकार ना धों महानोर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या गाण्यांबद्दल...


N D Mahanor Passes Away: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर   (N D Mahanor)  यांचं निधन झालं आहे.वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी लिहिलेल्या गाण्यांमध्ये तसेच कवितांमध्ये निसर्गाचा उल्लेख होता.  मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून  ओळखले जात होते. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना. धों. महानोर  यांनी अनेक मराठी चित्रपटांमधील गाणी लिहिली आहेत. जाणून घेऊयात त्यांनी  गाण्यांबद्दल...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Horror Thriller Serial: रात्रीस खेळ चाले ते आहट; छोट्या पडद्यावरील 'या' हॉरर मालिका तुम्ही पाहिल्यात का?



हॉरर चित्रपट आणि मालिका बघायला अनेकांना आवडतात. जाणून घेऊयात छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या हॉरर मालिकांबद्दल...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा