Premachi Goshta : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका बरीच रंजक वळणावर आहे. मिहिकाने अचानक हर्षवर्धनसोबत लग्न केल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. मुक्ता जेव्हा तिला समजावते तेव्हाही मिहिका तिच्याशी उद्धटपणे बोलते. त्यामुळे सागर आणि मुक्ता तिच्यावर खूप चिडतात. पण मिहिका हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकली असल्याचा ठाम विश्वास मुक्ता व्यक्त करते. दुसरीकडे मिहिर मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ असतो. 


दरम्यान महिकाने मर्जीने नाही तर जबरदस्तीने हर्षवर्धनसोबत लग्न केल्याचं सत्य उघड होतं. मिहिका आणि हर्षवर्धनमध्ये संबंध निर्माण झाल्याचे खोटे रिपोर्ट्स हर्षवर्धन तयार करतो आणि मिहिकाला धमकी देतो. त्यामुळे मिहिका घाबरते आणि ती हर्षवर्धनसोबत लग्न करायला तयार होते. 


मुक्ता सागर घेणार सावनीची मदत?


मिहिकाच्या या निर्णयानंतर सागर आणि मुक्ता या दोघांनाही मोठा धक्का बसतो. त्यावेळी सावनी मुक्ता आणि सागरला भेटते. हर्षवर्धनने लग्न केल्यानंतर सावनी आदित्यसोबत हॉटेलवर राहायला जाते. म्हणून मुक्ता तिला घरी यायला सांगते. त्यावर सावनी नकार देते आणि मुक्ता सुनावते. तिला म्हणते की, मला कुणाच्याच उपकारांची आणि दयेची गरज नाही. तिचं बोलणं ऐकून सागर सावनीवर चिडतो.


मिहिरला बसतो मोठा धक्का?


कोळींच्या घरी जेव्हा मिहिका येते तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून मिहिरला मोठा धक्का बसतो. त्याला मिहिकाच्या या वागण्यावर विश्वासच बसत नाही. त्याची ही अवस्था पाहून घरातले सगळेच अस्वस्थ होतात. इंद्रा मिहिकाची सावनीसोबत तुलना करुन तिच्या कानशि‍लात लगावते. त्यामुळे आता सागर आणि मुक्ता या सत्याच्या शोध कसा लावणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.


मिहिका आणि हर्षवर्धनचं लग्न


हर्षवर्धनची बायको म्हणून मिहिका सगळ्यांसमोर येते. हे पाहून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्यावर मुक्ता हर्षवर्धनच्या घरी जाऊन मिहिकाला जाब विचारते. त्यावर मिहिका देखील मी हर्षवर्धनसोबत माझ्या मर्जीने लग्न केलं असल्याचं म्हणते. त्यामुळे आता यावर मुक्ता आणि सागर काय करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : कोकण हार्टेड गर्लच्या 'त्या' प्रतिक्रियेवर निक्कीची सटकली; म्हणाली, 'वेळ आल्यावर बरोबर...', नेमकं काय घडलं?