Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आता नवी घडामोड घडणार आहे. कार्तिक मुक्तावर हात टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मुक्ता कार्तिकची विकृती इंद्रा, स्वातीला सांगते. पण, दोघीही त्याचीच बाजू घेतात. इतकंच नाही तर इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावते. काही माणसं वरवर कितीही चांगला वागत असला तरी त्याच्या मनात विकृती असू शकते. याचा फायदा कार्तिकसारखी लोक घेतात.'प्रेमाची गोष्ट'च्या आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना आज काय पाहायला मिळणार?
पुरू मुक्ताची समजूत काढणार
अष्टविनायक यात्रेला जाण्याआधी पुरू लेकीची म्हणजे मुक्तासोबत संवाद साधतात. मुक्ता आणि सागरमध्ये काही तरी बिनसलं असल्याचे पुरुच्या लक्षात येते. पुरू आपल्या लेकीला समजवतात. सागरकडून चुका झाल्या असतीलच पण तो व्यक्ती म्हणून वाईट असेल, त्याला वाळीत टाकणे हे चुकीचे असल्याचे पुरू सांगतो. सागर हा वाईट असता तर मी तुझे लग्न त्याच्यासोबत का करून दिले असते असे पुरू सांगतो. नाते संबंधावर पुरू मुक्ताला समजावतो. डोळे आणि कान उघडे ठेवून विचार केला तर सागर हा वाईट नाही हे लक्षात येईल असेही पुरू सांगतो. आता, पुरूच्या बोलण्यानंतर मुक्ता काय करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सावनी भरणार सागरचे कान
ऑफिसच्या कामासाठी सागर आणि सावनी टूरवर असतात. या दरम्यान, सावनी सागरचे कान भरण्याचा प्रयत्न करते. मुक्ताने तुला माझ्यासोबत, एक्स-वाईफसोबत बाहेर पाठवले, असे विचारते. त्यावर सागर तुला देखील होणाऱ्या नवऱ्याने माझ्यासोबत पाठवले ना? असे म्हणतो. त्यावर सावनी सागरचे कान भरते आणि तुझ्याकडे विश्वास आणि प्रेम दोन्ही नाही असे म्हणते. सावनीच्या बोलण्यामुळे सागर विचारात पडतो.
कार्तिक मुक्तावर हात टाकणार
इकडे घरी मुक्ता तिच्या बेडरुममध्ये विचार करत बसलेली असते. त्याच वेळी कार्तिक घरी येतो आणि तिच्या शेजारी बसतो. मुक्तासोबत वेगळ्या अर्थाने तो संवाद साधतो. तिला नको तो स्पर्श करतो. मुक्ता त्याला रुमबाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि खडे बोल सुनावते. सागर आणि तुमच्यात नवरा-बायकोसारखं काहीच नाही हे मला माहित आहे, असे कार्तिक मुक्ताला सांगतो. कार्तिक मुक्ताला स्पर्श करतो. त्यावर मुक्ताचा संताप होतो. कार्तिकला मुक्ता सुनावते आणि हात लावला तर या घरचे जावई आहेत हे विसरेल असा सज्जड इशारा देते. कार्तिकला मुक्ता प्रचंड सुनावते आणि बेडरुमबाहेर येते.
इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार, कार्तिकची घेणार बाजू
मुक्ता हॉलमध्ये येते तेव्हा इंद्रा आणि स्वाती येतात. त्यांना पाहून मुक्ताला हायसे वाटते. तुम्ही वेळेवर आलात हे बरं झाले असे सांगते. कार्तिकने माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगते. कार्तिकची नजर वाईट असल्याचे मुक्ता सांगते. मुक्ताच्या बोलण्यावर स्वाती आणि इंद्राला विश्वास बसत नाही. मुक्ताच्या आरोपावर इंद्रा संतापते आणि तिच्या कानशिलात लगावते. जावयाविरोधात एक शब्द बोलली तरी जीभ कापून देईल असे इंद्रा सुनावते. स्वाती देखील मुक्तावर विश्वास ठेवत नाही आणि तिलाच उलट बोलते. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठीच तू अशी वागते. तुझ्याच मनात चोर आहे, कार्तिकला असे करायची गरज काय, मी त्यांची बायको असे स्वाती मुक्ताला सांगते. इंद्रा मुक्ताला सुनावते आणि स्वत:च्या नणंदचा संसार मोडीत काढण्याचा प्रयत्न करते. तुला लाज वाटली पाहिजे असे इंद्रा म्हणते. स्वाती देखील कार्तिकला माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगते. कार्तिकही भावूक झाल्याचे नाटक करून मला या घरात क्षणभरही थांबायचे नाही असे सांगतो. इंद्रा कार्तिकची बाजू घेऊन मुक्ताला सुनावते.