Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshtha) मालिकेत सागर-मुक्तामध्ये प्रेम फुलत असताना आता दुसरीकडे मिहिर-मिहिकाच्या प्रेमाला घरच्या मंडळींचीदेखील मंजुरी मिळणार आहे. मिहिर-मिहिका हे एकमेकांवर किती प्रेम करतात, एकमेकांना सांभाळून घेणार का, हे जाणून घेण्यासाठी सागर-मुक्ता नाटक करतात.  मालिकेचा आजचा एपिसोड हा हलकाफुलका असणार आहे.


चिठ्ठीमुळे मिहिर-मिहिकाचे प्रेमप्रकरण होणार जगजाहीर...


सागर आणि मुक्ता पार्किंगमध्ये एका चिठ्ठीमुळे येऊन भेटतात. दोघांमध्ये गैरसमज होतो. पण, पार्किंगमध्ये भेटण्याबाबतची चिठ्ठी ही आपण लिहिलेली नाही हे दोघांच्या लक्षात येते. त्याचवेळी मुक्ता मिहीर आणि मिहीकाला पाहते. मिहिर मिहिकाला लग्नासाठी मागणी घालत असतो. हे पाहून सागर-मुक्ता हे मिहिर आणि मिहिकाला घरी आणतात. मिहिर-मिहिकाचे प्रेमप्रकरण सगळ्या घरांसमोर आणतात. 


सागर-मुक्ता करणार विरोधाचे नाटक


मुक्ता आणि सागर मिहिर-मिहिकाच्या लग्नाला विरोध करण्याचे नाटक दर्शवतात. दोघेही एकमेकांच्या उणीवा सांगतात. दोघांच्या सवयींवर सागर-मुक्ता बोलत असतात. त्यामध्ये सकाळी उठण्यापासून ते  वक्तशीरपणा यावर सागर-मुक्ता दोघांच्या उणीवा सांगतात. त्यावर मिहिका चिडते. आम्ही तीन-साडेतीन वर्षांपासून ओळखतो. मला मिहिरचा स्वभाव माहित आहे. तो उधळपट्टी करत असला तरी मी सेव्हिंगची सवय लावत असल्याचे मिहिका सांगते. मिहिरदेखील मिहिकाच्या बाजूने बोलतो. सागर-मुक्ता त्यावर तुम्ही एकमेकांना किती साथ देताय हे पाहत होतो असे सांगतात.


घरातील मंडळी खूश, इंद्रा नाराज


मिहिर-मिहिकाच्या लग्नाच्या बातमीमुळे बापूंना आनंद होतो. इंद्रा मात्र नाराज असल्याचे दिसते. सागर हा मिहिरसाठी मिहिकाचा पुरू-माधवीकडे हात मागतो. पुरू-माधवीदेखील या लग्नाला होकार देतात. दोघांचाही उद्याच साखरपुडा उरकून घेऊयात असे सांगतात. 


मिहिर-मिहिकाच्या साखरपुड्यात सावनी अडथळा आणणार


मिहिरच्या साखरपुड्याची माहिती हर्षवर्धनला कळते. सागर-मुक्ताच्या घरी आनंदाचे वातावरण असल्याचे तो सावनीला सांगतो. मिहिरचा साखरपुडा होणार असल्याचे सांगताच सावनीला धक्का बसतो. आपण हा साखरपुडा होऊच देणार नाही, असे सावनी सांगते.