Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता सागर कोळीची कसोटी लागणार आहे. एका बाजूला मुक्तासोबत खोटं बोलून विश्वासाला पुन्हा तडा द्यायचा की वडील म्हणून आदित्यच्या पाठिशी उभे राहायचे यावर त्याच्या मनात द्वंद सुरू असते. आता सागर यातून काय मार्ग काढणार, माधवीच्या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या दोषीचा चेहरा, नाव उघड होणार का या प्रश्नांची उत्तरे येत्या काही एपिसोडमध्ये मिळतील.
मुक्ताचा दावा ठरणार खोटा, सागर मागणार माफी...
इंद्रा मुक्तावर चिडलेली असते. त्याच वेळी सागर येतो. सागरच्या सांगण्यावरून आईचा अपघात हा कार्तिकने केला असल्याचे मुक्ताने सांगितले असते. त्यावरून मुक्ता घरी माधवी आईचा अपघात हा कार्तिकने केला असतो असे सांगते. पण, इंद्रा-स्वातीचा विश्वास बसत नाही. मुक्ताचा दावा ऐकून इंद्रा चिडलेली असते. सागर मुक्ताची माफी मागून तो अपघात कार्तिकने केला नसल्याचे सांगतो.
सागरच्या सांगण्यावरून मुक्ताने कार्तिकवर आरोप केल्याने तिच्यावर इंद्रा-स्वाती चिडते. त्यावर सागर हा मुक्ताने माझ्या सांगण्यावरून हे सांगितले असल्याचे सांगतो. मुक्ताला काही तरी सांगायचे आहे, असे सागर म्हणतो. पण, त्याच वेळी सई घरी येते आणि माधवी आजीने मुक्ताईला बोलावले असल्याचे सांगते. मुक्ता आपल्या आईला भेटण्यासाठी जाते.
कार्तिकची चिडचिड...
इकडं सागर का मागे लागला आहे, या विचाराने कार्तिकची चिडचिड होते. माधवीच्या अपघातासाठी मी जबाबदार आहे, हे सागरला वाटते. पण माझा काही संबंध नाही असे कार्तिक सावनीला सांगतो. त्यावर सावनी हे प्रकरण मी सगळं हाताळले आहे आणि आता याची जास्त चिंता करू नको असे सावनी कार्तिकला सांगते.
सागरच्या मनात द्वंद
माधवीच्या अपघातासाठी जबाबदार असणाऱ्याला सोडणार नसल्याचे मुक्ता सागरला सांगते. इकडं सागरच्या मनात द्वंद सुरू असते. कार चालवणारा हा आदित्य आहे हे सागरला माहीत आहे. पण, ते मुक्ताला कसे सांगायचे याचा विचार सागर करत असतो. ज्या ठिकाणी माधवीचा अपघात झाला, त्या ठिकाणच्या एका दुकानदाराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झालेली असते. अपघाताचे फूटेज देण्यास तो दुकानदार तयार असल्याचे मुक्ता सागरला सांगते. आता, सीसीटीव्हीत कार कोण चालवत होता, याचा उलगडा होईल आणि आदित्य अडचणीत येईल अशी भीती सागरला वाटते.
आता सागर आदित्यला वाचावणार का, मु्क्ताला सगळं सत्य समजणार का, सावनी आदित्यचा वापर करून मुक्ता-सागरचा संसार मोडणार का, याची उत्तरे येत्या एपिसोडमध्ये मिळतील.