Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट'मध्ये (Premachi Goshta) मागील काही एपिसोडमध्ये शह-कटशह, सूड नाट्य दिसून आले होते. मात्र, आजचा एपिसोड हा नेहमीपेक्षा वेगळा ठरणार आहे. मालिकेतील आजचा एपिसोड हा रोमँटिक असणार आहे. सागर आणि मुक्ताच्या नात्यात विश्वास, प्रेमाने जागा घेतली आहे. आता,या दोघांमधील प्रेम आणखी फुलणार आहे.
मिहिरमुळे सागरला होणार जाणीव
मिहिर मिहिकासोबत फोनवर रोमँटिक बोलत असतो. त्याच वेळी सागर येतो आणि मिहिरचे बोलणं ऐकतो. मिहिर सागरला प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबन (किस) महत्त्वाचा असतो हे सांगतो. मिहिरच्या बोलण्याने सागर विचारात पडतो. मुक्ताच्याही नवरा म्हणून माझ्याकडून काही अपेक्षा असतील हे मी विसरलो असल्याचे सागरच्या लक्षात येते. मुक्ताचा विचार सागरच्या डोक्यात घोळत असतो. मात्र, आपण काही केल्यास मुक्ताने आपल्याला मारलं तर... असाही विचार सागरच्या मनात येतो. पण, काहीही झालं तरी आता आपण पुढाकार घ्यायचा आणि मुक्ताला आणखी वाटा पाहायला लावायची नाही असे सागर ठरवतो.
सागरची होणार फजिती
सागर घरी आल्यानंतर मुक्ता घरी बेडरुममध्ये पांघरूण घेऊन झोपली असल्याचे दिसते. मुक्ता यावेळी घरी कशी असा विचारही सागरच्या मनात येतो. त्यावेळी सागर मुक्तासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण, ती झोपलेली व्यक्ती मुक्ताच आहे का, हे पाहत नाही आणि आपल्या मनातील भावना बोलण्यास सुरुवात करतो. सागर नात्याबद्दल आणि पहिल्या किसबद्दल बोलत असतो. मात्र, सागर पांघरूण काढतो तेव्हा झोपलेली व्यक्ती लकी असल्याचे समजते. त्यावेळी सागर घाबरतो. त्याचवेळी मुक्ताही येते. लकी मुक्ताला म्हणतो की, वहिनी तू दादूस विचार की तो यावेळी कशाला, कोणत्या कामासाठी आलाय हे विचार. लकीच्या रुमच्या साफसफाई सुरू असल्याने तो सागरच्या बेडरुममध्ये आलेला असतो. बेडरुममधून बाहेर पडताना लकी सागरला म्हणतो की, पुढच्या वेळी काही करण्याआधी चादरी खाली कोण आहे हे पाहा रोमिओ. हे ऐकून मुक्ताही लाजते.
सागर मुक्तामध्ये फुलणार प्रेम
लकी बेडरुममधून निघून गेल्यावर मुक्ता आणि सागर दोघेही असतात. मुक्ताच्या ईअर रिंगमध्ये तिचा स्कार्फ अडकतो, तिला तो सोडवता येत नसतो. सागर तिला मदत करायला जातो तेव्हाही ती त्याला नकार देते. तेव्हा सागर तिची मदत करतो आणि म्हणतो की, सगळ्या गोष्टी एकट्याने करू शकतो असे तुम्हाला वाटते का? त्यावर मुक्ता म्हणते की, 'का? आजची स्त्री आहे मी, सेल्फ मेड आणि स्वावलंबी. सागर त्यावर म्हणतो की मी जे करणार ते तुम्ही कराल का? असे म्हणत सागर मुक्ताच्या गालावर किस घेतो. सागरची ही कृती मुक्तासाठी सुखद धक्का असतो. सागरच्या या कृतीवर मुक्ता प्रेमाने भावूक होते. आता तुम्हीदेखील मी जे केलं आहे, ते तुम्हीदेखील करा असे सागर मुक्ताला सांगतो. मी त्या क्षणाची वाट पाहतोय असे सागर मुक्ताला म्हणतो. मुक्ता विचारात गुंग असताना तेवढ्यात इंद्रा येते आणि मुक्ताला राहिलेल्या कामाची आवराआवर करायला सांगते. मुक्ता इंद्राला असंबंध उत्तर देत असते, याची जाणीव मुक्ताला होते आणि वेळ सांभाळून घेते.
हॉलमध्ये सगळे बसले असताना सागर इशाऱ्यानेच मुक्ताला खुणावत असतो. हे पाहून मुक्ता त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नाटक करते. आता मुक्ता सागरला कसा प्रतिसाद देणार, त्याचे आव्हान पार पाडणार का, हे पुढील एपिसोडमध्ये दिसून येणार आहे.