Premachi Goshta Serial Update : सागर आणि मुक्तामध्ये प्रेमाचे नात फुलत आहे. मुक्ताच्या वटपौर्णिमा पूजेत अडथळा आणण्यासाठी सावनी प्रयत्न करते. मुक्ता वडाची पूजा केल्यानंतर घरी येते पण अचानक कोसळते आणि बेशुद्ध पडते. मुक्ता बेशुद्ध का होते, मुक्तासाठी सागर काय धावपळ करतो, सावनीचा या मागे हात आहे का, याची उत्तरे प्रेक्षकांना 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मिळतील.
स्वातीचा उपवासाला नकार...
स्वातीने कार्तिकसाठी उपवास ठेवला नाही. कार्तिकने कोणत्याच नात्याची किंमत ठेवली नाही. माझ्यापेक्षा तुच कार्तिकला पाठिशी घातले. असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा असे स्वाती इंद्राला सांगते.
मुक्ताच्या पूजेत सावनी आणणार अडथळा...
सावनी मुक्ताच्या वटपौर्णिमेच्या फेऱ्यात अडथळे आणण्यासाठी तिच्या ताटातील धाग्यांवर कटर मारते. मुक्ता वडाला फेऱ्या मारताना धागामध्येच तुटतो. धागा तुटल्याने मुक्ता मनात भीती निर्माण होते, हा धागा कसा तुटला असा विचार करते. पण, तो तुटलेला धागा सागर धरतो. हा धागा कोणीतरी तोडला आहे पण त्यामुळे आपलं नातं सैल होणार नाही असे म्हणत तुटलेला धागा पुन्हा बांधतो आणि आता गाठ घट्ट बांधली असल्याचे सांगतो. मुक्ता डोळ्यात सागरबद्दल प्रेम दिसून येते. मुक्ताची वटपौर्णिमा पूर्ण होत असल्याने सावनीचा तिळपापड होत असतो.
सावनीच्या फोनने हर्षवर्धनची चिडचिड...
इकडं घरी आल्यावरही सावनी चिडते आणि हर्षवर्धनला फोन करते. आपल्या लग्नाची घोषणा कधी करणार याची विचारणा करते. मला मुक्ताला, तिच्या आईला, सागरला दाखवून द्यायचे आहे. मी कधी नको नको त्या लोकांचे ऐकून घेतले असल्याचे सावनी सांगते. सावनीच्या या तगाद्यावरून हर्षवर्धनची चिडचिड होत असते. अखेर तो लग्नाची घोषणा करणार असल्याचे सांगतो. हर्षवर्धनच्या या आश्वासनानंतर सावनी खूश होते. आमच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर मिळणार असून आता मीडियात आमच्या लग्नाची चर्चा असणार याचे स्वप्न सावनी रंगवते.
मुक्ता होणार बेशुद्ध
वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर घरी आलेल्या मुक्ताला अचानक चक्कर येते आणि त्यात ती बेशुद्ध होते. या प्रकारामुळे सागर आणि घरातील मंडळी चिंतेत असतात. सागर डॉक्टरांना बोलावतो. मुक्ता बेशुद्ध झाल्याने सागर मुक्ताला बोल लावते आणि सांगते की आजकालच्या मुलींना डाएट करता येते पण उपवास झेपत नाही. स्वाती इंद्राची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. सागर तिथून निघतो आणि मुक्ताकडे जातो.
मुक्ताला बेशुद्ध अवस्थेत पाहून सागर चिंतेत असतो. मुक्ताचा हात हातात घेतो, त्याला मुक्तासोबत घालवलेले क्षण आठवतात. या आठवणीने तो भावूक होतो, त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात. तुम्हाला काहीच होणार नाही असे सांगतो, डॉक्टर येत असल्याचे सांगतो.
आदित्यच्या बोलण्याचा सागरला धक्का, सावनीला सुनावणार
सावनी हर्षवर्धनला फोन करून मुक्ता बेशुद्ध झाली असल्याचे सांगते. फोनवर बोलताना मुक्ता बेशुद्ध झाल्याचे नाटक करत असल्याचे सांगते. तिला लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. आम्ही इकडं आल्याने तिचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळेच तिचे नाटक सुरू असल्याचे सावनी फोनवर सांगते. आदित्य हे सगळं ऐकत असतो. मुक्ता नाटक करत असेल तर आपण इकडं का थांबलोय असा प्रश्न आदित्य करतो. त्यावर सावनी म्हणते की, सागर पॅनिक झाला आहे. त्याला आपली गरज भासू शकते. तेवढ्यात सागर हॉलमध्ये येतो. त्याचवेळी आदित्य त्याला म्हणतो की तुम्ही काळजी करू नका. मला हे सगळं ती नाटके करत आहे, आम्ही इकडं आल्याने तिचे महत्त्व कमी झाले आहे. माझ्यासोबत तुम्ही जास्त वेळ घालवताय म्हणून ती नाटक करत असल्याचे आदित्य म्हणतो.
आदित्यचे हे बोलणं ऐकून सागरला धक्का बसतो. सावनीवर सागर संतापतो आणि आदित्यवर हेच संस्कार केले का, तुझ्यासारखंच त्याला वाईट करत आहेस. आदित्यच्या मनात मुक्ताबद्दल असलेल्या रागाला, द्वेषा खतपाणी घालणं बंद कर असे सागर सांगतो. सागर आदित्यला तुझा गैरसमज झाला असल्याचे सांगतो. मुक्ता कधीही खोट बोलत नाही. त्या नाटक करत नाही. त्या इतरांचे दु:ख कमी करतात. स्वत:ला त्रास झाला तरी दुसऱ्यांचा आनंद वाढवतात. तुला जे वाटतंय चुकीचे असल्याचे सागर आदित्यला समजावून सांगतो.
मुक्ताला झालंय काय?
घरी डॉक्टर येतात आणि मुक्ताची तपासणी करतात. मुक्ताची मेडिकल हिस्ट्री माहीत असल्याचे डॉक्टर सांगतात. मुक्ताचा आजार हा पू्र्णपणे बरा होण्यासारखा नाही. त्यांनी दोन-तीन उपाशी राहणे चुकीचे असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यांना इंजेक्शन दिले आहे, दोन तासात शुद्धीवर येतील. जर, मुक्ता दोन तासात शुद्धीवर आल्या नाहीत तर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे डॉक्टर सांगतात. डॉक्टरांच्या या बोलण्याने घरातले चिंतेत पडतात.