Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता नव्या कथानकाची पार्श्वभूमी तयार होण्याची शक्यता आहे. सागरने अचानकपणे समर कॅम्पला येण्यास नकार दिल्याने सई नाराज आहे. तर, इंद्राने स्वातीच्या मुलीचं बारसं करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे आदित्यवरून सागर-सावनीत खटके उडणार आहे.


स्वातीच्या मुलीचे बारसं करणार इंद्रा


इंद्रा स्वातीच्या मुलीचे बारसं करण्याचा निर्णय घेते. त्यावर स्वाती भावूक होते आणि मु्लीचं कौतुक करणारा व्यक्ती जवळ नाही असे सांगते. त्यावर इंद्रा मी असताना तू काळजी नको करू असे सांगते. इंद्रा बापूंना बोलावून स्वातीच्या मुलीचे बारसं उद्याच करूयात असे म्हणते. त्यावर बापू पुढील महिन्यात करुयात असे सांगतात. मुक्ताच्या आईची प्रकृती चांगली नाही, अशा स्थितीत आपण कार्यक्रम करणे योग्य ठरणार नाही असे सांगतात. पण इंद्रा ऐकत नाही, उद्याच बारसं करुयात असे सांगतात. 


नाराज सईची मुक्ता काढणार समजूत 


सागर पप्पाने  ऐनवेळी समर कॅम्पला येण्यास नकार दिल्याने सई नाराज झाली असते. सागर पप्पाला आदित्यच जास्त आवडतो. मी आवडत नाही असे सई चिडून म्हणते.  मुक्ता तिची चिडचिड कमी करण्यासाठी समजूत काढते. सईची नाराजी दूर होते. पण, मुक्ताच्या मनात सागरच्या निर्णयावर नाराजी असते.


माधवीला  चक्कर आल्याने ती पडते. त्यावरुन घरातील सदस्य घाबरतात. डॉक्टर माधवीची तपासणी करतात, अपघातामुळे चक्कर येण्याची लक्षणे दिसू शकतात असे डॉक्टर सांगतात. माधवीची प्रकृती खालावली असल्याचे दिसल्याने मुक्ता भावूक होते आणि रडू लागते. त्यावर माधवी तिची समजूत घालतात. अपघात करणाऱ्याला धडा शिकवणार असल्याचा निश्चय मुक्ता मनाशी करते.



सागर देणार आदित्य वेळ, गोड बोलणाऱ्या सावनीला सुनावणार


इकडं सागर आदित्यसोबत सुट्टी घालवतो. बुद्धीबळाच्या डावात आदित्य सागरला पराभूत करतो. आदित्यचा आनंद गगनात मावेनासा होतो. हे सगळं सुरू असताना सागरला मुक्ताचा फोन येतो. हे पाहून आदित्य चिडून जातो. मुक्ता सागरला आईला चक्कर आली असल्याचे सांगते. त्या कार चालकामुळे आईला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल संताप व्यक्त करते. त्या दोषीला सोडायचे नाही असेही सांगते. 


सावनी सागरसोबत गोड गोड बोलत माझ्यासाठी एवढं काही करतोय असे सांगते. त्यावर सागर चिडतो. हर्षवर्धनसोबत राहून तुम्ही आदित्यचे आयुष्य उद्धवस्त करत असल्याचे सांगतो. त्यावर सावनी मी आई आहे, आदित्यला काहीही होऊ देणार नाही  असे सांगते. आदित्यवरून सागर-सावनीमध्ये जोरदार वाद होतो. 


स्वातीच्या मुलीच्या बारशाची तयारी


घरातले सगळेजण एकत्र बसतात. इंद्रा सगळ्यांना स्वातीच्या मुलीच्या बारशाबाबत सांगते. सगळेजण मान्य करतात. इंद्रा घरातील लोकांना जबाबदारीचे वाटप करते. मुक्ताला आईची चिंता सतावते. एकीकडे आई आजारी आणि दुसरीकडे  घरात महत्त्वाचा कार्यक्रम, कसे मॅनेज करायचे असा प्रश्न मुक्ताला पडतो.