Premachi Goshta Serial Update :  सागर-मुक्ताकडून पु्न्हा मात मिळालेल्या सावनी-हर्षवर्धनने आता आपला पुढचा डाव टाकला आहे. सागर-मुक्ताची व्यावसायिक बदनामी करण्यासाठी हर्षवर्धनने आपला प्लान सावनीला सांगितला असून आता मुक्ताची डॉक्टरकीच पणाला लागली आहे. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मध्ये आजच्या भागात मुक्ता-सागरवर आलेले नवं संकट येणार आहे. 


सागर मुक्ताला नेणार शॉपिंगला...


सागर मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जातो.  सागरला अचानकपणे क्लिनिकला पाहून आश्चर्य वाटते. त्यावर सागर तिला मी तुम्हाला शॉपिंगला घेऊन जायला आलो आहे. क्लिनिकमध्ये दोघांची मस्ती सुरू असते. अचानक दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले असताना तिथे मुक्ताची असिस्टंट येते. त्यावेळी सागर तिला शॉपिंगला घेऊन जाणार असल्याचे सांगतो आणि हात खेचून घेऊन जातो. 


हर्षवर्धन आखणार नवा डाव...


इकडं सागर-मुक्ताच्याविरोधात सावनी-हर्षवर्धन कट आखतात. दोघांची व्यावसायिक बदनामी करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगते. त्यावर हर्षवर्धन माझ्या माणसांनी काम सुरू केले असल्याचे सांगतो. त्याच वेळी हर्षवर्धनचा मित्र सत्यम येतो. हा सत्यम मुक्ताच्या क्लिनिकमध्ये दात दुखतोय म्हणून आलेला तिरसट पेशंट असतो. त्याने आपण मुक्ताला कसा त्रास दिला होता हे सांगतो. मुक्ताच्या अडचणीत वाढ करणार असल्याचे तो सांगतो.  आता मुक्ता कशी अडचणीत येईल याचा विचार करून सावनी मनात खूप खूश होते. 


गोखलेंच्या घरात लग्नाची लगबग...


गोखले कुटुंबाच्या घरी मिहिकाच्या लग्नाची लगबग सुरू असते. पुरु माधवीला लग्नानंतर आपण अक्ककोटहून गोव्याला फिरायला जाऊयात असे सांगतो. या दोघांचे बोलणे सुरू असताना सागर मुक्ता मिहीर आणि मिहिका तिथे येतात. मिहिका बोलते की माझं लग्न आहे पण मला कोणाचाच उत्साह दिसत नाही असे सांगते. मी लग्न करून दुसऱ्या घरी जाणार हे मला कोणी वाटूच देत नाही असे सांगते. मिहिका चिडचिड व्यक्त करत असताना माधवी तिच्यावरून चिडून आपल्या मनात किती घालमेल सुरू आहे हे सांगते. माधवीच्या बोलण्याने घरातील वातावरण भावूक होते. पण, तुमच्या मुली दुसऱ्या घरी चालल्या आहेत, याचा विचार करू नका तर तुम्हाला आता दोन मुलं मिळाली आहेत असा विचार करा असे मिहिर माधवीला सांगतो. घरातील वातावरण आनंदी असताना घरात एक पत्र येते. 


मुक्ताला आली नोटीस...


हे पत्र मुक्ताच्या नावाने असते. यामध्ये मुक्ताला दंतवैद्यकीय प्रमाणपत्र का रद्द करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावलेली असते.अशी नोटीस पाहून मुक्ताला धक्का बसतो. मुक्ताचा पडलेला चेहरा पाहून सागरही विचारात पडतो. मुक्ताच्या मनात सुरू असलेली घालमेल सागरच्या नजरेतून लपत नाही. नोटीस का आली याचा विचार करत असताना दुसरीकडे आरतीचा फोन येतो. काही लोकांनी क्लिनिक बंद केले असल्याचे सांगते. सत्यम पाटील या त्या दिवशीच्या पेशंटने आपल्याविरोधात तक्रार केली असल्याचे आरती मुक्ताला सांगते. 


मुक्ताला चिंतेत पाहून सागर काय घडलं याची विचारपूस करतो. मुक्ता सागरला आलेली नोटीस दाखवते. सागरही हैराण करते. त्या दिवशी आलेल्या पेशंटने तक्रार केली असल्याचे मुक्ता सागरला सांगते.