प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज बेपत्ता!
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 06:45 AM (IST)
मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात नवं वळण आलं आहे. प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज बेपत्ता आहे. राहुल राजवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांचं पथक राहुलला शोधण्यासाठी त्याच्या अपार्टमेंटमध्ये गेलं होतं. पण घराला कुलूप होतं. पोलिसांनी राहुल राजला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नाही. शिवाय त्याचा फोनही स्विच ऑफ आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. पोलिसांना राहुल राजची चौकशी करायची आहे आणि त्याला अटकही होऊ शकते, असं वर्सोवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण काळे यांनी सांगितलं. राहुल राजने सत्र कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर राहुल बेपत्ता झाला आणि त्याचा फोनही स्विच ऑफ झाला आहे. प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती संबंधित बातम्या