मुंबई : बॉलिवूडची बंगाली ब्यूटी, अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती, अभिनेता करण सिंग ग्रोव्हर लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करण्याची शक्यता आहे. एका ट्रॅव्हल शो आणि रिअॅलिटी शोसाठी या नवविवाहित जोडप्याला विचारणा झाली आहे.
करण आणि बिपाशा यांनी 'अलोन' चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. त्यानंतर दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता मोठ्या पडद्यावर नाही, मात्र छोट्या पडद्यावर हे जोडपं एकत्र दिसू शकतं.
बॉलिवूडलाईफ.कॉमच्या वृत्तानुसार बिपाशानेही याला दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप ही ऑफर आपण स्वीकारली नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. मात्र करणसोबत एखादा शो करणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट असेल, असंही ती म्हणते.
लग्नानंतर दोघांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या हनिमून आणि ट्रीपचे फोटो पाहायला मिळत आहेत.