मुंबई : एबीपी माझाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा रोवला गेला आहे. अतिशय मानाचा समजला जाणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात ‘एबीपी माझा’ला सर्वोत्कृष्ट मराठी वृत्तवाहिनीचा पुरस्कार मिळाला आहे.


 

मुंबईत रविवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला. या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमासाठी एबीपी माझाच्याच 'ढॅण्टॅढॅण' या कार्यक्रमाला पुरस्कार मिळाला आहे. मनोरंजन विश्वातील घडामोडींचे अपडेट 'ढॅण्टॅढॅण'च्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळतात.

 

प्रत्येक बातमी निष्पक्षरित्या प्रेक्षक आणि वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एबीपी माझाचा असतो. त्यामुळे माझाच्या या धडपडीला मिळालेला हा पुरस्कार बहुमूल्यच आहे.