Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील  प्रसिद्ध कार्यक्रामाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक प्रेक्षक हा कार्यक्रम आवडीनं बघतात.  कार्यक्रमातील कलाकार सेटवरील मज्जा, मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच अभिनेता प्रसाद ओकनं (Prasad Oak) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये प्रसाद आणि अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हे हात जोडून उभे आहेत, असं दिसत आहे. 


प्रसाद ओकची पोस्ट 


प्रसाद ओकनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये वनिता खरात, प्रसाद, सई ताम्हणकर, सोनी मराठीचे सिनियर वाईज प्रेसिडेंट (Senior Vice President) अमित फाळके हे हात जोडून उभे आहेत, असं दिसत आहेत. या पोस्टमध्ये प्रसादनं लिहिलं, 'वनिताच्या लग्नाला उपस्थित राहता न आल्यामुळे मी, सई ताम्हणकर आणि अमित फाळके, जाहीर माफी मागत आहोत. ' या पोस्टमध्ये प्रसादनं विनिताला देखील टॅग केलं आहे. प्रसादच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 



प्रसादची ही पोस्ट रिपोस्ट करुन वनिताने, 'गिफ्ट दिल्याशिवाय माफी नाही मिळणार', असं लिहिलं आहे. 




काही दिवसांपूर्वी वनिता खरात आणि सुमित लोंढे यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या टीमनं हजेरी लावली होती.  वनिता आणि सुमितच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वनितानं तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे तसेच हळदीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती. 






'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी  करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Vanita Kharat: वनिता खरातनं लग्नात घेतला खास उखाणा; म्हणाली, '...तूच माझा माहाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा'