नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'डिस्कवरी'वरील प्रसिद्ध कार्यक्रम 'Man Vs Wild' मध्ये झळकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे होस्ट बेअर ग्रिल्ससोबत दिसतील. बेअर ग्रिल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या कार्यक्रमाचा छोटा व्हिडीओ शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा हा कार्यक्रम 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता डिस्कवरी चॅनेलवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात मोदी पशुसंवर्धन आणि पर्यावरण परिवर्तन याबाबतच्या जागृततेवर बोलणार आहेत. जगभरातील 180 देशांमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी प्रसारित होणार आहे.
"180 देशांतीन नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी बाजू दिसणार आहे. पशुसंवर्धन आणि पर्यावरण परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी भारतातील जंगलांमध्ये जाऊन आव्हानात्मक काम केलं आहे", असं ट्वीट बेअर ग्रिल्सने केलं आहे. दोघांमध्ये पशुसंवर्धन आणि पर्यावरण या विषयावर दीर्घ चर्चा झाल्याचं ग्रिल्सने सांगितलं.
या कार्यक्रमात नरेंद्र मोदींचं वेगळं रुप लोकांना पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी यांनी उत्साहात 'वेलकम टू इंडिया', असं म्हणत बेअर ग्रिल्सचं स्वागत केलं. कार्यक्रमात मोदी बिअर ग्रेल्ससोबत नदीत छोटी नाव चालवताना, जंगलात फिरताना या प्रोमोमध्ये दिसत आहे.
VIDEO | कोण आहे मॅन व्हर्सेस वाईल्डचा बेअर ग्रिल्स? | बातमीच्या पलीकडे