Phulala Sugandh Maticha: स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) मालिकेत सध्या कीर्तीची नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत सुरु आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं कीर्तीचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आता तिची कसोटी सुरु आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांचा शोध घेताना कीर्तीने याआधी आपलं शौर्य दाखवलंच आहे. खास बात म्हणजे ट्रेनिंगपासून ते मालिकेतले हे धाडसी प्रसंग साकारताना कीर्तीने बॉडी डबलचा वापर न करता स्वत: हे फाईट सीक्वेन्स पूर्ण केले आहेत.


नोकरी आणि घरची जबाबदारी पार पडताना सध्या तिचा कस लागतोय. हाच प्रसंग प्रोमोमधून दाखवण्यासाठी यावेळी कीर्तीला असाच एक धाडसी प्रसंग शूट करावा लागला ज्यात ती दोरीवरुन चालतेय. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा आहे.


पाहा व्हिडीओ :



अभिनेत्रीने स्वीकारलं दोरीवर चालण्याचं आव्हान


मालिकेतील ‘कीर्ती’ म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान होतं. फाईट मास्टर आणि मालिकेची संपूर्ण टीम जरी सोबत असली, तरी समृद्धीने दोरीवर चालण्याचं हे कसब आत्मसात केलं. दोन तीन वेळा सराव केल्यानंतर समृद्धीने अपेक्षित असलेला शॉट दिला आणि सेटवर सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. गेले दोन वर्ष समृद्धी केळकर या मालिकेत कीर्ती ही व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय, तर ती जगतेय. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी नवी आव्हान उभी ठाकतात, तेव्हा समृद्धी त्याचा हसत हसत सामना करते.


मालिकेला मिळतोय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद


‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत समृद्धी केळकरने किर्ती ही भूमिका साकारली आहे. मालिकेतील किर्तीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तर निकीता पाटील, गिरीश ओक, हर्षद अतकरी या कलाकांनी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येते. प्रेक्षक ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर पाहू शकतात.


हेही वाचा: