Ajay Purkar : मराठमोळे अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) गेले अनेक दिवस पावनखिंड (Pawankhind) सिनेमामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आता अजय पुरकर यांनी 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) मालिकेतून निरोप घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 


'मुलगी झाली हो' ही मालिका गेले अनेक दिवस विविध कारणांमुळे चर्चेत होती. आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. अजय पुरकर यांनी अचानक मालिका सोडल्याने प्रेक्षकांना धक्का बसला आहे. अजय पुरकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.


 


अजय पुरकर यांनी लिहिले आहे, 'मुलगी झाली हो' या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे...पुन्हा लवकरच भेटू...नवीन प्रोजेक्ट घेऊन...तोपर्यंत हर हर महादेव..". लवकरच अजय पुरकर 'शेर शिवराज' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


'पावनखिंड' सिनेमात अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सध्या अजय पुरकर 'शेर शिवराज'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.


अजय पुरकर यांचे 'कोडमंत्र' नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात त्यांनी अभ्यासू अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काम केले होते. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक गाजलेल्या प्रोजेक्टचा अजय पुरकर भाग आहेत.


'पावनखिंड' सिनेमात अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाने अजय पुरकर यांना नवी ओळख दिली आहे. त्यांच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कधी नायक तर कधी खलनायक म्हणून अजय पुरकर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. 


संबंधित बातम्या


Batman On Ott : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'द बॅटमॅन' ओटीटीवर होणार रिलीज


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Chandramukhi : 'चंद्रा'ची सोनाली कुलकर्णीला भुरळ; शेअर केला जबरदस्त व्हिडीओ