Onkar Bhojane : 'कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', 'एकदम कडक' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सारख्या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर अर्थात ओंकार भोजनेने (Onkar Bhojane) पहिल्यांदाच प्रेमाबद्दल भाष्य केलं आहे. सकाळला दिलेल्या मुलाखतीत ओकांर म्हणाला,"मी कोकण हार्टेड गर्ल'चा मोठा चाहता आहे".
सकाळला दिलेल्या मुलाखतीत ओंकार भोजने प्रेमाबद्दल म्हणाला,"प्रेम हे ठरवून होत नसतं, मी कधी प्रेमात पडलेलो नाही. मी कधीच प्रेम वगैरे या भानगडीत पडलेलो नाही. माझ्या लग्नाची जबाबदारी घरच्यांनी आणि मित्रपरिवाने घेतली आहे. त्यामुळे मी विचार करण्याची गरज नाही".
ओंकार भोजने कोणाला फॉलो करतो?
इंडस्ट्रीतली आवडती क्रश कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना ओंकार म्हणाला,"क्रश नाही. पण मला 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आवडते. मी तिला फॉलो करतो. तिचा स्वभाव मला आवडतो. ती ज्याप्रकारे एखादा सामाजिक मुद्दा उचलून धरते त्याविषयी भाष्य करते ते मला आवडतं. मी तिचा एक चाहता आहे".
विनोदाचं परफेक्ट टायमिंग असल्यामुळे ओंकार भोजने अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने ओंकारला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पण काही कारणाने त्याने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला. नुकताच त्याचा 'सरला एक कोटी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ओंकारसोबत या सिनेमात ईशा केसकर, छाया कदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्याचं 'करुन गेलो गाव' हे नाटक आता रंगभूमीवर गाजत आहे. राजेश देशपांडे दिग्दर्शित असलेल्या या नाटकाचे राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर निर्माते आहे. या नाटकात ओकांर भोजने आणि भाऊ कदमची जोडी धुमाकूळ घालत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ओंकारने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणालेला,"सगळं छान सुरु होतं, पण मला पुढे दोन चित्रपटांसाठी थांबायचं होतं. त्यांना पण अॅडजेस्टमेंट करावी लागणार होती. माझ्या प्रकृतीच्या पण काही तक्रारी होत्या. तेव्हा सुट्टी घेतली ती कायमचीच. नंतर मी फू बाई फू मध्ये काम केलं. मी या सगळ्यामधून शिकत आहे".
संबंधित बातम्या