Taarak Mehta Ka Ooltah Chashmah New Tapu: छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  हा शो लोक आवडीनं बघतात. या मालिकेच्या नव्या एपिसोडप्रमाणेच जुन्या एपिसोड्सला देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. ही मालिका जवळपास 14 वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता काही नव्या कलाकारांची एन्ट्री या मालिकेमध्ये होत आहे.  'तारक मेहता का उल्टा चष्मा'  या मालिकेत राज अनादकट (Raj Anadkat) हा कलाकार टप्पू ही भूमिका साकारत होता. त्यानं काही महिन्यांपूर्वी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता या मालिकेत अभिनेता नितीश भालुनी (Nitish Bhaluni) हा टप्पू ही भूमिका साकारणार आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते आसित मोदी  (Asit Modi) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली. 


कोण आहे नितीश भालुनी? 


‘मेरी डोली मेरे अंगना’  या मालिकेमध्ये नितीशनं काम केलं आहे. आता तो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये टप्पू ही भूमिका साकारणार आहे. नितीश भालुनी हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर चार हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. आता  'तारक मेहता का उल्टा चष्मा'  मालिकेतील नितीशच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये असित मोदी हे नितीशबद्दल प्रेक्षकांना माहिती देताना दिसत आहेत. 


पाहा व्हिडीओ:



'या' कलाकारांनी सोडली मालिका



28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. शैलेश लोढा (Shailesh Lodha) , राज अनादकट (Raj Anadkat) ,दिशा वकानी (Disha Vakani) , झील मेहता, भव्या गांधी या कलाकारांनी मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.   या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला टप्पूने ठोकला रामराम; पोस्ट शेअर करत म्हणाला,"मी पुन्हा येईन"