Nikki Tamboli Chhatrapati Sambhajinagar Connection : बिग बॉस मराठीचा सध्या पाचवा सीझन सुरु आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकापेक्षा एक कल्लाकार स्पर्धक पाहायला मिळत आहेत. त्यातच पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. बिग बॉस हिंदीमधून बिग बॉस मराठीमध्ये आलेली निक्की तांबोळी यंदाच्या सीझन सुरु झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. निक्कीने पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठीचं घर डोक्यावर घेतलं आहे.
मराठमोळी मुलगी बनली साऊथ इंडस्ट्रीतील नायिका
निक्की तांबोळी बिग बॉस 14 मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यामुळे प्रसिद्धीझोतात आली. पण, त्याआधी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निक्की तांबोळी 2019 कांचना 3 चित्रपटात झळकली होती, हा चित्रपट सुपरहिट ठरला. 2020 मध्ये बिग बॉस 14 मध्ये निक्की दुसरी रनरअप ठरली. त्यानंतर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली. फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी 11 मध्ये निक्की स्पर्धक होती. खतरा खतरा खतरा मालिकेच्या काही एपिसोडमध्येही ती दिसली होती.
निक्की तांबोळीचं छत्रपती संभाजीनगर कनेक्शन
निक्की तांबोळी सध्या डोंबिवलीमध्ये राहते. मीडिया रिपोर्टनुसार, निक्की मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे. निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 रोजी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आधीच औरंगाबाद येथे झाला. तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. निक्कीचं शालेय शिक्षण आणि पदवी शिक्षणही तिथेच झालं आहे. निक्की तांबोळीचे वडील एक व्यावसायिक आहेत.
निक्की तांबोळीचं करिअर आणि चित्रपट
निक्की तांबोळीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. तिने अनेक चित्रपट आणि प्रोजेक्टसाठी ऑडिशन दिली. ऑडिशनसाठी निक्की चेन्नईमध्ये पोहोचली आणि तिचं नशीब बदललं. चिकाटी गाडिलो चिथाकोतुडू (Chikati Gadilo Chithakotudu) या तेलगू चित्रपटातून पूजा या भूमिकेतून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं. 2019 मध्ये तमिळ चित्रपट कंचना 3 मध्ये तिने दिव्याची भूमिका साकारली होती. यानंतर निक्की तिप्परा मीसम (Thipparaa Meesam) हा तिचा तिसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरला. 2020 मध्ये तिने बिग बॉस 14 मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं, तेव्हा ती प्रसिद्धीझोतात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :