Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) पहिल्या दिवसापासून निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी यांची मैत्री पाहायला मिळाली. पण मागच्या काही दिवसांपासून ही सगळी समीकरणं बदलली असल्याचं चित्र सध्या आहेत. त्यातच आता चांगले मित्रच एकमेकांना गद्दार म्हणू लागले आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचा हा आठवडा कसा असणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये कोणता सदस्य कोणाला नॉमिनेट करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान निक्की वैभववर शब्दांचे वार करताना दिसणार आहे.
'तुझ्यासाठी इथे मी गद्दारच'
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये वैभव निक्कीला नॉमिनेट करताना दिसत आहे. त्यामुळे निक्की वैभवला म्हणतेय,"तुझ्यापेक्षा या घरात गद्दार कोणीच नाही". त्यावर वैभव म्हणतो,"तुझ्यासाठी इथे मी गद्दारच आहे. तुझ्यासोबत अशी गद्दीरी दाखवणारे की बघ. तू थेट कचरापेटीत जाऊन बस. तुझा बोलण्याचा काही संबंध नाही". निक्कीसोबत वाद घातल्यानंतर वैभव तिचाच नॉमिनेट करतो.
आज पॅडी दादा आणि छोटा पुढारी अरबाजबद्दल गप्पा मारताना दिसणार आहेत. अरबाजचा सगळा गेम पलटला आहे. त्यामुळे पॅडीला छोटा पुढारी म्हणतोय,"मी अरबाजला बोललो आहे की बाहेर आम्ही बावळट दिसतोय. आपल्यासमोर एक वागतोय आणि निक्कीसमोर वेगळा वागतोय. तोंडावरचा राग स्पष्टपणे त्याने सांगावा".
रंगणार नॉमिनेशनचा टास्क
आज 'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याचा खेळ दमदार नाही तो सरळ रद्दीचा भार बनणार आहे. प्रोमोमध्ये, असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना आज रद्दीत टाकून इतर सदस्य नॉमिनेट करताना दिसणार आहेत. स्वत:चं डोकं नसणाऱ्यांना, खेळातला समज नसणाऱ्या, स्वत:ची मतं नसणाऱ्या, घरातल्या गद्दार व्यक्तीला सदस्य नॉमिनेट करताना दिसणार आहेत. त्यामुळे सहाव्या आठवड्यात कोणता सदस्य नॉमिनेट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी वाचा :
Gautami Patil : गौतमी पाटील बिग बॉसच्या घरात जाणार का? म्हणाली...