Gautami Patil :  सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) अशी ओळख असलेल्या गौतमीने आतापर्यंत अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याचप्रमाणे तिचे डान्सचे व्हिडीओही सोशल मीडियावरही बरेच व्हायरल होत असतात. त्यामुळे गौतमीची संपर्ण महाराष्ट्रात सातत्याने चर्चा सुरु असते. पण कायम चर्चेत राहाणाऱ्या या गौतमीला चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) घरात सहभागी व्हायला आवेडला ही चर्चा आता रंगू लागली आहे. 


गौतमीने नुकतीच स्टार मीडिया एंटरटेनमेंटला मुलाखत दिली. त्यामध्ये तिला बिग बॉसच्या घरात सहभागी होणार का? याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमीने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचप्रमाणे गौतमीने बिग बॉसच्या घरातील कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट केला आहे, हे देखील समोर आलं आहे. 


गौतमी बिग बॉसच्या घरात जाणार?


गौतमीला बिग बॉसच्या घरात सहभागी व्हायला आवडेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना गौतमीने नो कमेंट्स असं म्हटलं.पुढे तिने म्हटलं की, माझे दौरेच इतके असतात की, मला टिव्ही पाहायला वेळच मिळत नाही. असं नाहीये की मला ह्यात इंट्रेस्ट नाही, पण मला त्यासाठी वेळ नाही मिळत. त्यामुळे गौतमीला बिग बॉसच्या घरात जायला आवडणार नाही हे यावरु स्पष्ट झालं आहे. पण गौतमी बिग बॉसच्या घरातील कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करते किंवा कोणता स्पर्धक जिंकावा असं तिला वाटतं, यावर मात्र गौतमीने स्पष्ट भाष्य केलं आहे. 


या स्पर्धकाला गौतमी करते सपोर्ट


गौतमीने सूरजच्या सपोर्टसाठी म्हटलं की, सूरज बेस्ट ऑफ लक तूच जिंकून ये. त्यामुळे गौतमी सध्या सूरजला खूप सपोर्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरजला सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट मिळत असल्याचं चित्र सध्या आहे. तसेच घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांनीही सूरजचं भरभरुन कौतुक केलं आहे. त्यामुळे सूरज आता बिग बॉसची ट्रॉफी उचलणार का? याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.                                                                                 


ही बातमी वाचा :


Santosh Juvekar : 'हा माथेफिरू दिग्दर्शक...', संतोष जुवेकरची अनुराग कश्यपसाठी पोस्ट