Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या या मालिकेत रंजक वळण आलं आहे. इंद्रा आणि दीपूच्या नात्याचं सत्य अखेर मालतीसमोर आलं आहे. मात्र मालती हे सत्य देशपांडे सरांपासून लपवून ठेवणार आहे.
इंद्रा आणि दीपूच्या नात्याचं काय होणार? आई आणि देशपांडे सरांसाठी दीपू-इंद्रा त्यांच्या प्रेमाचा त्याग करणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये इंद्रा मालतीला म्हणतो, 'हो आहे मी गुंड, मी करतो वसुलीचं काम परंतु दीपिका मॅडमवर असलेलं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही'.
'मन उडू उडू झालं' मालिकेत सध्या इंद्रा-दीपूला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.
संबंधित बातम्या