Shilpa Shetty Digital Debut : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने नुकतीच त्याच्या कॉप ड्रामा सिरीजची घोषणा केली होती. रोहित शेट्टी Amazon Prime सोबत मिळून ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) नावाची सिरीज बनवत आहे. या सिरीजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता रोहित शेट्टीच्या या सिरीजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) एण्ट्री झाली आहे.


‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीची ही पहिली वेब सिरीज असणार आहे. शिल्पा देखील या सिरीजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिल्पा शेट्टी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे.


 







उत्सुकता रोहित शेट्टीच्या वेबसिरीजची!


नुकतीच रोहित शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पहिल्या वेब सिरीजची घोषणा केली होती. या वेळी त्याने एक छोटीशी झलक देखील शेअर केली. यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचीही झलक पाहायला मिळाली. सध्या या सिरीजची शूटिंग सुरू झाली आहे. आता शिल्पा शेट्टी देखील लवकरच या सिरीजच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.


‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘सूर्यवंशी’ या पोलीस पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटानंतर आता रोहित शेट्टी याच थीमवर आधारित वेब सिरीज तयार करणार आहे. रोहित शेट्टीच्या धमाकेदार अॅक्शन चित्रपटांना प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतोच. आता चाहते आणि प्रेक्षक त्याच्या या पहिल्या-वहिल्या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा :